ॲडव्हेंटेज विदर्भ २०२६मध्ये आयुर्वेदाचे सामर्थ्य अधोरेखित

28 Feb 2026 14:54:28
नागपूर,
Advantage Vidarbha 2026 खासदार औद्योगिक महोत्सव ‘ॲडव्हेंटेज विदर्भ २०२६’ अंतर्गत आयोजित आयुर्वेद विषयक विशेष सत्रात आयुर्वेद क्षेत्रातील श्री विश्वामृत आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे प्रख्यात तज्ज्ञ वैद्य डॉ. समीर जमदग्नी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. डॉ. जमदग्नी यांनी आयुर्वेदातील क्लिनिकल उपचारपद्धतीचे महत्त्व स्पष्ट करत आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेद कसा प्रभावी ठरतो, यावर सखोल विवेचन केले. समतोल व सात्त्विक आहाराचे आरोग्य संवर्धनातील स्थान, पंचकर्म उपचारांची उपयुक्तता तसेच रोगप्रतिबंधक दृष्टिकोन यावर त्यांनी उदाहरणांसह प्रकाश टाकला.
 
nagpur
 
तसेच आयुर्वेद क्षेत्रात उद्योजकतेच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे नमूद करत औषधी वनस्पतींची शास्त्रीय लागवड, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात क्षमता याविषयी मार्गदर्शन केले. आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी समग्र जीवनशैली आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. Advantage Vidarbha 2026 कार्यक्रमाची सविस्तर माहिती डॉ. समीर जमदग्नी यांचे विद्यार्थी तसेच विश्व कुंभ आयुर्वेदिक चिकित्सालयाचे संचालक डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांनी दिली. या सत्राला आयुर्वेद अभ्यासक, विद्यार्थी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0