तळोधी (बा)
ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणार्या Tigers in the Balapur-Yenoli बाळापूर-येनोली परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून दहशत माजवणार्या वाघिणीला शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जेरबंद केले गेले. सध्या शेतीतील रोवणीची कामे सुरू असल्याने शेतकरी शिवारात जाण्यास भीत होते. वाघिणीच्या उपस्थितीमुळे शेतीकामांवर परिणाम होत होता व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून वनविभागाने तात्काळ विशेष पथके तैनात करून 24 तास गस्त वाढवली. वनरक्षक, कर्मचारी व मजूर यांच्या साहाय्याने परिसरात सातत्याने पाहणी, पायवाटांची तपासणी तसेच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत होत्या. ग्रामस्थांना रात्री एकट्याने बाहेर न पडण्याचे, शेतात समूहाने जाण्याचे आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात येत होते.
Tigers in the Balapur-Yenoli वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम राबविण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक माने तसेच वर्ग कर्मचारी यांनी सक्रिय सहकार्य करत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला आणि वाघिणीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. अखेर शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास टि-139 मादी वाघिण वय अंदाजे 20 महिने या वाघिणीस बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. या वाघिणीची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ही कारवाई ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (तेंदू) एम. बि. गायकवाड, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) अरविंद, वनपरिक्षेत्र अधिकार ए. आर. कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक ए. जी. मने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पोलिस हवालदार अजय मराठे व त्यांची चमू, आरआरटी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बायोलॉजीस्ट राकेश आहुजा उपस्थित होते.