वाशीम जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट
प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्याची गरज
वाशीम,
उन्हाळ्याला अद्याप सुरुवात झाली नसतानाच जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी झपाट्याने खालावत आहे. जिल्ह्यात विदर्भ पाटंबधारे विकास महामंडळ आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील एकूण १६० लघू आणि ३ मध्यम प्रकल्पांत सरासरी ५० टक्केच साठा उरला आहे. त्यातच वाशीम तालुयातील एकबुर्जी आणि मालेगाव तालुयातील सोनल या दोन मध्यम प्रकल्पांत सरासरी ४७ टक्केच साठा उरला आहे. त्यामुळे आगामी काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र Water storage project प्रकल्पातील पाणी साठ्यावरुन दिसून येते.
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस पडला. जिल्ह्यात जून ते सप्टेंदरम्यान ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना या कालावधित तब्बल १ हजार मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प काठोकाठ भरले. यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही, अशी शयताही वाटू लागली. मात्र, यंदा कृषी रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. त्यामुळे पाण्याचा उपसाही वाढला. दुसरीकडे फेब्रुवारीच्या मध्यंतरापासूनच उन्हाच्या झळा वाढू लागल्याने बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात सुरू झाले. याचा फटका प्रकल्पांतील पाणीसाठ्याला बसत आहे. जिल्ह्यातील १६० लघू आणि ३ मध्यम प्रकल्प, अशा एकूण १६३ प्रकल्पांत सरासरी ५० ते ५१ टक्केच जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे.
Water storage project जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ३५ टक्के अधिक पाऊस पडल्यामुळे तीन मध्यम आणि १६० लघू प्रकल्पांत एकूण ९८.५१ टक्के जलसाठा झाला. पाटबंधारे विभागाच्या ७५ प्रकल्पांत सरासरी ९७.१३ तर जलसंधारण विभागाच्या ८५ प्रकल्पांत सरासरी ९९.७४ टक्के साठा झाला. मात्र सिंचनासाठी वाढलेला उपसा आणि वाढत्या उष्णतेमुळे अवघ्या चारच महिन्यात हा साठा आता निम्म्यावर आला आहे.
वाशीम तालुयाला Water storage project पाणी पुरवठा करणार्या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पाच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पात केवळ ४६.४५ टयांपेक्षा कमीसाठा उरला आहे. त्यामुळे वाशीम शहराचा पाणी पुरवठा लवकरच प्रभावित होण्याची शयता वाढली आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुयात असलेल्या अडाण या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. या प्रकल्पात सद्यस्थितीत ७० टक्के पाणीसाठा असल्याने यावर अवलंबून पाणी पुरवठा योजनांवर प्रभाव पडण्याची शयता कमी आहे. जिल्ह्यातील १६० लघू प्रकल्पातील पाणीसाठा ४८.७० टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी ५४.७४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी महिन्यात वाशीम शहरासह जिल्हावासीयांना पाणी टंचाईला समोर जावे लागण्याची शयता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासून पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.