बचाव केंद्रातील वाघ आणि बिबट्यांना दिल्लीत पाठविणार

    दिनांक :03-Feb-2026
Total Views |
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या बैठकीत होणार निर्णय
 
नागपूर, 
गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय Central Zoo  प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रातील वाघ आणि बिबट्यांना दिल्ली आणि पाठविण्याचा प्रस्ताव केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. ’सीझेडए’ची मंजुरी मिळताच या केंद्रातील ८ वाघ व ८ बिबट दिल्ली व नागालँडला पाठविण्यात येणार आहेत. देशांतर्गत इतर शहरातील प्राणीसंग्रहालयांमध्ये अदलाबदलीनुसार हा प्रस्ताव केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे.
 

groop 
 
पुढील आठवड्यात Central Zoo केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची बैठक होणार असून, त्यात गोरेवाडा बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांना पाठविण्याची परवानगी मिळू शकते. यापूर्वी मुंबई व कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात येथून वाघ पाठविण्यात आले होते. मानव-वन्यजीव संघर्षामुळे वाघ, बिबट्यांना पकडून गोरेवाडा बचाव केंद्रात ठेवण्यात येते. येथे वाघ, बिबट्यांची संख्या वाढली असून, केवळ अकरा पिंजरे आहेत. त्यामुळे बिबट्यांना पिंजर्‍यात ठेवावे लागत आहे.