फुलण्याआधीच कुस्करल्या गेल्या अल्पवयीन कळ्या

03 Feb 2026 13:54:13
अनिल कांबळे
नागपूर, 
prostitution-in-nagpur देहव्यापाराच्या दलदलित एकदा पाय टाकल्यानंतर त्यातून निघणे आयुष्यभर कठिण हाेऊन बसते. खेळण्या-बागळण्याच्या वयात अल्पवयीन कळ्या अमानुषपणे कुस्करल्या जातात. अल्पवयीन मुली, शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन तरुणींचे उपराजधानीत देहव्यापारात अडकल्याचे प्रमाण माेठे आहे. गेल्या वर्षभरात उपराजधानीत अल्पवयीन मुलींसह 68 तरुणी-महिलांची देहव्यापारातून पाेलिसांनी सुटका केली तर 62 दलालांवर गुन्हे दाखल केले. उपराजधानीतील देहव्यापाराचे जळजळीत वास्तव पाेलिसांनी दिलेल्या माहितीतून समाेर आले आहे.
 
 
prostitution-in-nagpur
 
उपराजधानीत ब्युटीपार्लर, मसाज अँड स्पा सेंटर, पंचकर्म, निवासी गाळ्यात किंवा माेठमाेठ्या हाॅटेलमध्ये अल्पवयीन मुलींसह महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार करवून घेण्यात येताे. अनेक मुली-तरुणींना ब्युटीपार्लरमध्ये किंवा स्पामध्ये काम देण्याच्या बहाण्याने महिला दलाल देहव्यापाराच्या जाळ्यात ओढतात. prostitution-in-nagpur अनेकदा काैटुंबिक गरिबी, पालकांचे दुर्लक्ष, किंवा घरगुती हिंसाचारामुळे या मुली सहजपणे दलालांच्या जाळ्यात अडकतात. एकदा का त्या देहव्यापारात ढकलल्या गेल्या की, त्यांचे बालपण, स्वप्ने आणि स्वातंत्र्य संपुष्टात येते. या अल्पवयीन मुलींवर दरराेज लैंगिक अत्याचार, मानसिक छळ, मारहाण आणि धमक्या दिल्या जातात. देहव्यापारात अडकल्यानंतर मुलींचे अश्लील फोटाे, व्हिडिओ काढून ठेवण्यात येतात. मुलीने काम करण्यास नकार दिल्यास व्हिडिओ-फोटाे कुटुंबियांना दाखविण्याची धमकी देऊन बळजबरीने देहव्यापार करवून घेण्यात येते. देहव्यापाराच्या गर्तेत अडकलेल्या अनेक मुली गंभीर शारीरिक आजार, मानसिक तणाव आणि नैराश्याच्या गर्तेत सापडतात. त्यांच्यासाठी बाहेर पडण्याचा मार्गच बंद केला जाताे. जर कुणी देहव्यापार करण्यास नकार दिल्यास तिचे आयुष्यसुद्धा उद्धवस्त केल्या जाते, हे वास्तव समाेर आले आहे.
62 दलालांना केली अटक
नागपुरात पाेलिसांनी वर्षे 2025 मध्ये देहव्यापाराच्या 31 ठिकाणांवर छापे घातले. या छाप्यात देहव्यवसायात बळजबरीने गुंवततलेल्या 68 मुली आणि तरुणींची सुटका केली. prostitution-in-nagpur देहव्यापाराच्या अड्ड्याचे संचालक 25 महिला आणि 37 पुरुषांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पैशाचे आमिष आणि असहायतेचा फायदा घेत मुली व तरुणींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेणाèया 62 जणांना अटक करण्यात आली.
हाॅटेल-स्पामध्ये सर्वाधिक छापे
शहरातील काही ब्युटीपार्लर, मसाज सेंटर आणि स्पामध्ये सर्वाधिक देहव्यापार सुरु असताे. शहरातील माेठमाेठ्या हाॅटेलमध्ये मुक्कामी असलेल्या आंबटशाैकीन ग्राहकांना थेट मुलींबाबत विचारणा करण्यात येते. यासाेबतच शहरातील काही बारमध्येसुद्धा मध्यरात्रीनंतर डान्सबारच्या नावाखाली खुलेआम देहव्यापार केल्या जाताे. prostitution-in-nagpur18 हाॅटेल आणि स्पामध्ये सुरु असलेल्या देहव्यापारावर छापे घालण्यात आले तर माेठमाेठ्या इमारतीमधील 12 फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या देहव्यापारावर छापे घालण्यात आले. सहा अल्पवयीन मुलींना पाेलिसांनी देहव्यापारातून मुक्त केले.
Powered By Sangraha 9.0