boy-sexually-assaulted-two-boys इंस्टाग्रावरील रील्स बघितल्यानंतर एका मुलाने दाेन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना नागपुरातील वाठाेडा परिसरात उघडकीस आली. हा प्रकार समाेर आल्यावर खळबळ उडाली आहे. वाठाेडा पाेलिसांनी आराेपी मुलावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.
आराेपी मुलगा हा 17 वर्षांचा आहे. तर पिडीत मुलांचे वय अनुक्रमे 8 व 11 वर्षे इतके आहे. पिडीत मुलांचे आईवडील कामगार आहे. पीडित दाेन्ही मुले शाळेत जातात. मात्र, आईवडील कामावर गेल्यावर मुले घरी एकटेच असतात. आराेपी मुलगा हा त्यांच्या ओळखीचा आहे. त्याने काही दिवसांअगाेदर दाेन्ही मुलांना धाक दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे केले हाेते. आराेपीने भिती दाखविल्याने पीडित मुलांनी कुणालाच काही सांगितले नाही. मात्र, त्यानंतर आराेपीची हिंमत वाढली व त्याने रविवारी दुपारी दाेघांवरही लैंगिक अत्याचार केला. सायंकाळी पिडीत मुलांचे पालक घरी आले. त्यावेळी एका मुलाला वेदना हाेत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी मुलाला काय झाले हे विश्वासात घेऊन विचारले असता हा प्रकार त्याने सांगितला. पालकांनी तातडीने वाठाेडा पाेलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली. पाेलिसांनी मुलांची वैद्यकीय तपासणी केली. boy-sexually-assaulted-two-boys अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आराेपी अल्पवयीन मुलाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची रवानगी बालसुधारगृहात केली. आराेपीविराेधात अॅट्राेसिटी व पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.