नागपूर,
लोकनेते Ajit Pawar अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात घेतल्यानंतर अस्थी विसर्जन यात्रेला सुरुवात झाली. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अस्थिकलश विसर्जन यात्रा आग्याराम देवी चौक, गांधी सागर, चिटणीस पार्क, बडकस चौक, सी.ए. रोड, वर्धमान नगर आणि वाठोडा मार्गे अंभोरा येथील संगमावर मार्गस्थ झाली.
Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह नागपूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लाडक्या नेत्याच्या अस्थींचे दर्शन घेतले. अनेक प्रमुख चौकांमध्ये अस्थिकलशावर पुष्पवृष्टी करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी अस्थिकलशाचे पूजन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. जनसामान्यांचे आणि विकासाचे महामेरू अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थींचे अंभोरा येथील वैनगंगा, कन्हान आणि आम नदीच्या संगमावर अत्यंत भावूक वातावरणात विसर्जन करण्यात आले.यावेळी उपस्थित जनसागराच्या डोळ्यांत आपल्या नेत्याप्रती असलेले प्रेम अश्रूंच्या रूपाने पाहायला मिळाले. अंभोरा येथे पूर्ण वैदिक मंत्रोच्चारात आणि शास्त्रोक्त सोपस्कारांनुसार अस्थी विसर्जन विधी पार पडला. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे ,कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर,जिल्हा सदस्य सलील देशमुख यांनी विधीवत पूजन करून साश्रू नयनांनी अस्थींचे विसर्जन केले.
Ajit Pawar या शोकपूर्ण प्रसंगी माजी नगरसेविका आभाताई पांडे, प्रशांत पवार, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, बजरंगसिंह परिहार, चंद्रपाल चौकसे, तानाजी वणवे, बाबा गुजर दुनेश्वर पेठे , नरेश अरसडे, राजू राऊत, प्रविण कुंटे, राजू नागुलवार, रमण मुकेश रेवतकर, रेखा चरदे, नायक व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादांचे कार्य आणि त्यांचे विचार महाराष्ट्राच्या मातीत सदैव जिवंत राहतील. आज ते शरीररूपाने आपल्यातून गेले असले तरी त्यांची शिस्त आणि विकासाची दूरदृष्टी आपल्यासाठी सदैव प्रेरणास्थान असेल, शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त