कोळसा खाण घोटाळा: ईडीचे बंगालमध्ये १० ठिकाणी छापे

    दिनांक :03-Feb-2026
Total Views |
कोलकाता, 
coal-mining-scam पश्चिम बंगालमधील १० ठिकाणी ईडीने मंगळवारी छापे टाकले. बेकायदेशीर कोळसा खाणकाम आणि वाहतुकीच्या कथित मनी लाँडरिंग चौकशीचा भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य पोलिस अधिकारी मनोरंजन मंडल यांच्यासह सुमारे दहा ठिकाणी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) कारवाई केली जात आहे.
 
coal-mining-scam
 
ही चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासल्या जाणाऱ्या दुसऱ्या कथित कोळसा घोटाळ्यापेक्षा वेगळी आहे. coal-mining-scam गेल्या महिन्यात, एजन्सीने कोलकातामधील राजकीय सल्लागार कंपनी आय-पीएसीच्या जागेवरही छापे टाकले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ताज्या कारवाईत किरण खान, शेख अख्तर, प्रबीर दत्ता, मिर्झा एच. बेग आणि इतर अनेकांच्या जागेवरही छापे टाकले जात आहेत.