महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना’ या संघटनेची स्थापना
नागपूर,
Maharashtra forest वनविभागातील १२,९९१ अस्थायी कर्मचार्यांच्या न्यायहक्कासाठी व सर्व स्थायी कर्मचारी अधिकारी आदींच्या अन्याय विरुद्ध लढा देण्याकरीता ’महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना या संघटनेची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता समितीचे निमंत्रक सचिन भारतीय यांनी दिली आहे.
Maharashtra forest या संघटनेची अधिकृत स्थापना आणि राज्यस्तरीय सभेचे आयोजन ७ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे होणार आहे. याप्रसंगी राज्यातील ११ ही वनवृत्तामधील प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण व एफडीसीएम मधील सर्व कर्मचारी अधिकारी या सभेत सहभागी होणार आहेत. वनविभागातील वाढता भ्रष्टाचार, कर्मचार्यांवरील अन्याय-अत्याचार आणि प्रलंबित असलेले १२ हजार अस्थायी पदांचे नियमितीकरण या मुख्य विषयांवर या सभेत ठोस भूमिका घेतली जाणार आहे.