ऑटोमोटिव्ह चौक ते लेखा नगर दरम्यान रूळ बसविण्याच्या कामास सुरुवात

03 Feb 2026 21:52:39
नागपूर, 
Nagpur Metro Rail Project नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याच्या कामास आता वेग प्राप्त झाला आहे. महा मेट्रोने ऑटोमोटिव्ह चौक ते लेखा नगर या मार्गावर रूळ बसविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. या अंतर्गत व्हायाडक्टवर फ्लॅश बट वेल्डिंग रुळ लावण्याचे काम हाती घेतले असून रात्रीच्या वेळेत ट्रॅक बसविण्याचे काम केल्या जात आहे.
 
 
metro one dsl
 
Nagpur Metro Rail Project फ्लॅश बट वेल्डिंग प्रक्रिया अंतर्गत १८ मीटर लांबीच्या स्वतंत्र रेल्सना जोडून ‘कंटिन्युअस वेल्डेड रेल’ तयार केली जाते. या प्रक्रियेत विद्युत प्रतिकार आणि हायड्रॉलिक दाबाचा वापर करून, कोणत्याही अतिरिक्त फिलर मटेरियलशिवाय रेलचे टोक एकमेकांना जोडले जाते. या यंत्राद्वारे सुमारे ७०० वेल्ड्स यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या असून, त्यामुळे या विभागातील बॅलस्टलेस ट्रॅक बसविण्याच्या कामाला गती मिळाली आहे. ऑटोमोटिव्ह चौक ते लेखा नगर दरम्यानचा सुमारे ६.५ किमी लांबीचा हा विभाग नागपूर मेट्रो फेज-१ मधील ऑरेंज लाईनचा महत्त्वाचा विस्तार आहे. रेल जोडणीच्या कामामुळे या विभागातील व्हायाडक्टचे काम ट्रॅक पूर्णतः सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Powered By Sangraha 9.0