अखंड वीजपुरवठ्यासाठी आज देखभाल-दुरुस्तीची कामे

    दिनांक :03-Feb-2026
Total Views |
नागपूर, 
Power supplies शहरातील वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन भूमिगत केबल टाकणे आणि ’एबी स्विच’ची देखभाल, वीजवाहिन्यांना अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि इतर तातडीची तांत्रिक कामांसाठी महावितरणतर्फे बुधवार ४ फेब्रुवारी रोजी विविध भागांत देखभाल व दुरुस्ती मोहीम राबवण्यात येणार आहे. या अत्यावश्यक कामांमुळे बुधवारी शहरातील काही भागांत काही तासांसाठी वीजपुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. ही कामे पूर्ण होताच वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत केला जाईल.
 
 
mahavitaran
 
Power supplies  मुख्यत: या कामांमुळे काँग्रेसनगर विभागात सकाळी ८ ते १२ या वेळेत तेलंगखेडी, रामनगर, मरारटोली, गोंदटोली, कॉलनी, रविनगर, नगर पहिला बस स्टॉप, जोशी वाडी, एसबीआय कॉलनी, गोपाल नगर दुसरा बस स्टॉप, जयताळा येथील वीजपुरवठा बंद राहील. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत गजानन धाम, सहकार नगर, प्रगती हाऊसिंग सोसायटी, इस्टेट, मेघदूत व्हिला, पराते नगर, येथील वीजपुरवठा बंद राहील. सकाळी ९ ते १२ या वेळेत सुभाष नगर, नगर, कामगार कॉलनी, नाईक ले आउट, हिंगणा रोड, शास्त्री ले आउट, उपभोक्ता, जिल्हा परिषद सीआरपीएफ, विवेका हॉस्पिटल, एटीसी स्टेशन, अग्ने लेआउट, नगर, पांडे हाऊस, शास्त्री लेआउट, गांधी बिल्डर, एन्सारा मेट्रो पार्क आणि लक्ष्मी इस्टेट या भागातील वीजपुरवठा बंद राहील. महाल विभागात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दर्शन प्रधानमंत्री आवास योजना, एनआयटी गार्डन, व्यंकटेश नगर फेज २, आदर्श नगर, ताजबाग, निराला कॉलनी, पंचवटी वृद्धाश्रम, चिटणीस पार्क, जवाहर नगर या भागातील वीज पुरवठा बंद राहील. गांधीबाग विभागात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तांडापेठ, मराठा चौक, ठक्करग्राम व बंगालीपंजा या भागातील वीज पुरवठा बंद राहील.