पुणे महापालिकेत ४५ नगरसेवकांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत

03 Feb 2026 21:38:50
पुणे,
education-of-corporators : पुणे महापालिकेतील १६५ नगरसेवकांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत मोठी विविधता दिसून येत आहे. निवडणूक अर्जात दिलेल्या माहितीनुसार, ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे, तर ४५ नगरसेवकांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंतच आहे. यामध्ये इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले नगरसेवक ३३ असून, फक्त १४ सदस्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे.
 
 
 
 
education-of-corporators
 
 
निवडणूक निकालानुसार भाजपच्या ११९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३, काँग्रेस १५ आणि उद्धवसेना १ उमेदवार निवडून आले आहेत. पुणे शहराचा कारभार आता या नगरसेवकांवर अवलंबून आहे. १६५ सदस्यांपैकी ३५ टक्के पदवीधर, ८ टक्के पदव्युत्तर शिक्षित, २० टक्के बारावीपर्यंत शिक्षित आणि २५ टक्के दहावीपर्यंत शिक्षित असून ७ सदस्यांची शैक्षणिक माहिती उपलब्ध नाही.
Powered By Sangraha 9.0