अहिल्यानगरला मिळाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा 'या' प्रकल्पास मंजुरी

04 Feb 2026 15:24:02
अहिल्यानगर,
Ahilyanagar national highway केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर–अक्कलकोट या ६ पदरी प्रवेश-नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिली आहे. हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा ठरणार असून, जिल्ह्याला राष्ट्रीय दर्जाच्या द्रुतगती महामार्ग जाळ्यात सामावून घेण्यास मदत होणार आहे.
 

Ahilyanagar national highway 
या प्रकल्पाच्या सुमारे ३७४ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी अंदाजे १९,१४२ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. ‘पीएम गतीशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणारा हा महामार्ग पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण भारतापर्यंत महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरेल, ज्यामुळे राज्यातील आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी अहिल्यानगरचा संपर्क अधिक वेगवान व सुलभ होणार आहे.
 
 
खासदार नीलेश लंके Ahilyanagar national highway यांनी सांगितले की, या प्रस्तावित महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट लाभ व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्रांना मिळणार आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय तसेच कृषीपूरक उद्योगांच्या वाहतुकीवरील खर्चात लक्षणीय बचत होईल, तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहे.यासोबतच औद्योगिक, गोदाम, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रातील नव्या गुंतवणुकीलाही चालना मिळणार आहे. प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुधारित दळणवळण व्यवस्था आणि वाढणारी औद्योगिक गुंतवणूक जिल्ह्याचा आर्थिक पाया अधिक भक्कम करेल, तसेच अहिल्यानगर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्याही केंद्रस्थानी येईल.
 
 
या निर्णयाचे स्वागत Ahilyanagar national highway करताना खासदार नीलेश लंके यांनी म्हटले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दळणवळण, व्यापार, शेती, उद्योग आणि रोजगार या सर्व क्षेत्रांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. केंद्र सरकारने अहिल्यानगरच्या विकास क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून, या महामार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल.नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर ६ पदरी महामार्ग हा अहिल्यानगरच्या भविष्यकालीन विकासाचा कणा ठरणार असून, जिल्ह्याला विकासाच्या नव्या युगात नेणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना खासदार लंके यांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0