अनाया बांगर लिंग बदल शस्त्रक्रिया करणार; व्हॅजिनोप्लास्टी म्हणजे काय?

04 Feb 2026 17:37:55
नवी दिल्ली,  
anaya-bangar-vaginoplasty-surgery भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सध्या तिच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे. अनायाने नुकतीच घोषणा केली की, ती येत्या मार्चमध्ये थायलंडमध्ये ‘जेंडर अफर्मिंग सर्जरी’ करणार आहे, म्हणजेच तिचा लिंग बदल करण्याची शस्त्रक्रिया करणार आहे. या निर्णयामध्ये तिच्या कुटुंबाने संपूर्ण पाठिंबा दिला असून, संजय बांगर स्वतः या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्यास तयार आहेत.
 
anaya-bangar-vaginoplasty-surgery
 
अनाया या प्रक्रियेच्या महत्त्वाच्या टप्प्याबाबत ‘व्हॅजिनोप्लास्टी’ शस्त्रक्रियेबद्दल माहिती घेत आहे. डॉ. रितू अग्रवाल, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, यांनी सांगितले की, व्हॅजिनोप्लास्टी ही आधुनिक व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. यात योनीची निर्मिती किंवा पुनर्रचना केली जाते. ट्रान्सजेंडर महिलांसाठी ही शस्त्रक्रिया त्यांना स्त्रियांप्रमाणे जननेंद्रिय प्राप्त करण्यासाठी केली जाते. शिवाय, प्रसूतीनंतर योनीमध्ये येणारी शिथिलता, जन्मतः झालेली विकृती किंवा अपघात किंवा कर्करोगामुळे झालेल्या नुकसानीसाठीही ही प्रक्रिया वापरली जाते. anaya-bangar-vaginoplasty-surgery अनाया बांगरच्या बाबतीत ही शस्त्रक्रिया तिच्या लिंग बदल प्रक्रियेचा अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अनायाने फॅशन डिझायनर सायशा शिंदे आणि अभिनेत्री त्रिनेत्रा हलदर गुम्माराजू यांच्याशी सल्लामसलत करून ही शस्त्रक्रिया थायलंडमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. शस्त्रक्रियेसाठी तिला किमान एक महिना थायलंडमध्ये राहावे लागेल आणि त्यानंतर दीर्घकाळ विश्रांती घ्यावी लागेल. या कालावधीत तिला क्रिकेट खेळता येणार नाही.
शस्त्रक्रियेचा खर्च भारतात साधारण 40,000 ते 1,50,000 रुपयांच्या दरम्यान असतो, मात्र गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये तो 2 लाखांपर्यंतही जाऊ शकतो. anaya-bangar-vaginoplasty-surgery थायलंडमध्ये राहण्याचा खर्च आणि हॉस्पिटल शुल्क यामुळे हा खर्च अधिक वाढू शकतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा शक्य आहे का? डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, व्हॅजिनोप्लास्टीमध्ये फक्त योनी मार्ग तयार केला जातो. गर्भाशय किंवा अंडाशय तयार करता येत नाहीत, त्यामुळे पूर्व पुरुष असलेल्या व्यक्तीला शस्त्रक्रियेनंतर नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करणे शक्य नाही. ही शस्त्रक्रिया केवळ शारीरिक स्वरूप बदलण्यासाठी आणि लैंगिक कार्यासाठी मदत करते. अनाया बांगरच्या निर्णयामागे कुटुंबाचा पाठिंबा आणि योग्य तज्ज्ञांचा सल्ला असून, हा टप्पा तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा व धाडसी पाऊल मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0