पारडसिंगा, भारसिंगी, जलालखेडा नदीवरील पुलाचे बांधकाम रखडले

- उच्च न्यायालयाची ‘सुओ-माेटाे अ‍ॅक्शन’ : काटाेल-वरुड मार्ग ठरताेय जिवघेणा

    दिनांक :04-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
nagpur-news : पारडसिंगा, भारसिंगी आणि जलालखेडा येथील जाम नदीवर असलेल्या पुलांची स्थिती अत्यंत बिकट आहे. सहा वर्षे लाेटूनही पुलांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने अ‍ॅड. तेजस काणे यांची काेर्ट मित्र म्हणून नियुक्ती करीत त्यांना दाेन आठवड्यांत रितसर जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिलेत.
 
 
 
ngp
 
 
 
जलालखेडा (ता. नरखेड, जि. नागपूर) काटाेल वरुड मार्गावरील तीन पुलांचे बांधकाम सहा वर्षांपासून पूर्ण हाेऊ शकले नाही. रस्ता सिमेंटचा झाल्यानंतरही पारडसिंगा, भारसिंगी आणि जलालखेडा येथील नदीवर असलेल्या पुलांची स्थिती अत्यंत बिकट आहे. मार्च 2020 मध्ये काेराेनामुळे काम थांबले; मात्र त्यानंतरही कामाची गती मंदच राहिली. परिणामी, नागरिक व वाहनचालकांना रस्त्यावर वळण मार्ग वापरावे लागतात. ज्यामुळे अपघात वाढले आहेत. याप्रकरणी न्या. अनिल किलाेर आणि न्या. राज वाकाेडे यांनी गंभीर दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
 
 
 
नदीवरील पुलांच्या कामात दिरंगाई हाेत असल्याने नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बांधकाम विभागावर गंभीर आराेप केले आहेत. पुलाच्या दाेन्ही बाजूंनी असलेल्या वळण रस्त्यामुळे वाहतुकीला धाेका निर्माण हाेताे. यावरून नागरिकांमध्ये असंताेष पसरला आहे आणि त्यांनी उच्चस्तरीय चाैकशीची मागणी केली आहे. तसेच काटाेल-वरूड मार्गावरील पुलांसाठी शेतकèयांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. जलालखेडा जाम नदीवरील जुन्या पुलावरून वाहन चालविताना अशाप्रकारे वळण मार्गावरून जावे लागते.
 
 
काटाेल-वरुड मागार्चे राष्ट्रीय महामार्गात हस्तांतरण झाल्यानंतर रस्ता सिमेंटचा तर झाला; पण या मार्गात असलेल्या नरखेड व काटाेल तालुक्या-तील तीन नदीला छेदून गेला असून, या नदीवरील पूल माेडकळीस आल्याने येथे नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, सहा वर्षात या पुलाचे काम पूर्णत्वास गेले नाही. या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.