कर्मचाऱ्यांचे मानधन तत्काळ द्या

04 Feb 2026 21:45:00
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
mandar-patki : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाèयांचे मागील महिन्यांचे मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.
 
 
y4Feb-Mandhan
 
 
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाèया स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनातंर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कंत्राटी स्वरूपात कार्यरत कर्मचारी जिल्हा व तालुका स्तरावर 15 ते 20 वर्षांपासून नियमित सेवा देत आहेत.
 
 
या कर्मचाèयांचे मानधन रखडले असून हे मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महेंद्र गुल्हाने, वंदना ढवळे, भारत चव्हाण, नितीन टिकले, आदित्य गायकवाड, प्रफुल शहाडे, पुजांजी देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0