चिंता नको! अवघ्या ८ दिवसात खात्यात जमा होणार PF चे पैसे

04 Feb 2026 13:22:12
नवी दिल्ली,
EPFO ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की, ईपीएफओची नवीन डिजिटल सेवा EPFO 3.0 लवकरच सुरु होणार आहे. या सेवेमुळे कर्मचारी आपला पीएफ (Provident Fund) आता अत्यंत सोयीस्कर आणि जलद मार्गाने काढू शकतील.
 

EPFO  
सरकारने दिलेल्या EPFO माहितीनुसार, आता EPFO संबंधित सर्व कामे पूर्णपणे ऑनलाइन केली जाऊ शकतील. यामध्ये पीएफ क्लेमसुद्धा याच पोर्टलवरून करता येईल, आणि खात्यात पैसे जमा होण्यासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले सर्व माहिती बरोबर भरलेली असावी आणि KYC पूर्ण केलेली असावी.पूर्वी पीएफ पैसे मिळण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागायची. विशेषत: जे कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलली असेल किंवा जुन्या नियोक्त्याशी संपर्क नाही, त्यांना क्लेम मंजुरी मिळायला खूप वेळ जात असे. EPFO 3.0 च्या सुविधेमुळे हे सर्व अडथळे दूर होतील. आता कर्मचारी स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकतील, नियोक्त्याची मंजुरीची गरज नाही.
 
 
 
 
नवी सुविधा UPI द्वारे पीएफ रक्कम थेट खात्यात जमा होण्याची सुविधा देखील देईल. त्यामुळे पैसे घेण्यासाठी बँकेकडे किंवा कागदपत्रांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, २०२५-२६ मध्ये ८.५३ कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी पीएफ क्लेम EPFO केले, आणि ही संख्या लवकरच आणखी वाढणार आहे.EPFO 3.0 सेवा लवकरच सुरु होणार असल्यामुळे, कर्मचाऱ्यांसाठी पीएफ काढणे आता खूप सोपे, जलद आणि पारदर्शक होईल. ही सुविधा मुख्यतः KYC केलेल्या कर्मचाऱ्यांना फायदा करेल, ज्यांना नोकरी बदलल्यामुळे जुना नियोक्ता उपलब्ध नाही, अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष सोयीस्कर ठरेल.
Powered By Sangraha 9.0