पुणे,
Pune human trafficking rescue अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाने पुण्यातील काही स्पा आणि लॉजवर छापा टाकून सहा महिलांना सुटका केली आहे. विशालनगर येथील ‘इंटर्नल फॅमिली स्पा’मधून चार तर निगडी येथील ‘ईगल स्पा’मधून दोन महिलांना मुक्त करण्यात आले. याशिवाय आळंदी येथील ‘योगीराज लॉज’ आणि कृष्णा लॉजवर छापा टाकून प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली.
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, इंटर्नल फॅमिली स्पावर रात्री सुमारे १० वाजता पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यादरम्यान चार महिलांना सुटका केली गेली असून, स्पा संचालक महिलेसह मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसैन कलाम यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पीटा (PITA) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडी येथील ईगल स्पा येथे देखील पोलिसांनी कारवाई केली असून, दोन महिलांना सुटका करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलांना मोठ्या पैशाचे आमीष दाखवून जबरदस्तीने देहव्यापार करायला लावले जात होते.गेल्या एका महिन्यात पुण्यात तीन स्पा सेंटरवर बंदी घालण्यात आली आहे. साल २०२५ मधील आकडेवारीनुसार आतापर्यंत २५ स्पावर कारवाई करून ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ६३ महिलांची सुटका करण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले की, अशा कारवायांमुळे पुण्यातील अनैतिक मानव तस्करीचे नेटवर्क हळूहळू उध्वस्त होत आहे, आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी नियमित छापे टाकण्याचे काम सुरू ठेवले जाईल.