भाजी विक्रेत्यांना भाजीमार्केट यार्डमध्ये जागा द्या

दिग्रस भाजपाकडून निवेदन

    दिनांक :04-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
digras-bjp : छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुतर्फा रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. याच रस्त्यावर फळ-भाजी विक्रेते, फेरीवाले दुकाने लावून बसतात. यांना नवीन भाजी मार्केट यार्डमध्ये तात्पुरते व बैठा कर घेऊन बसू देण्याच्या मागणीचे निवेदन बुधवार, 4 फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आले आहे.
 
 
y4Feb-Bhaji
 
 
 
भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे यांच्या पुढाकारात देण्यात आलेल्या निवेदनात भाजी विक्रेता व नवीन भाजी मार्केटयार्ड बाबतीत नगर परिषद मुख्याधिकाèयांना सूचित करण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतुकीची कोंडी, लोकांची वर्दळ आणि त्यात फळभाजी विक्रेत्यांची रस्त्यावर दुकाने हा सर्वांनाच विनाकारण त्रास देणारा विषय झाला आहे.
 
 
तर दुसरीकडे येथूनच 100 मिटर अंतरावर कोटींचा खर्च करून नवीन भाजीमार्केट यार्ड बांधून तयार आहे. मात्र त्याचा लिलाव होत नाही, लोकांनी या परिसराला मुतारी करून ठेवले आहे. असे असताना या मार्केट यार्डमध्ये काही कालावधीच्या करारावर व बैठा कर घेऊन फळ-भाजी विक्रेत्यांना बसू द्यावे, यामुळे हा परिसरही उपयोगात येईल, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
याबाबतचे निवेदन नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मनीष बारये यांना देण्यात आले असून चौकात फेरीवाले फळ-भाजी विक्रेते दिसल्यास त्यांना नपच्या नवीन भाजी मार्केट यार्ड परिसरातच बसण्याची सूचना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस अरुण राठोड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष काटेकर, महिला आघाडीच्या जागृती मेहता, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष वाजीद शेख, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष संजय घरत, भाजपा उपाध्यक्ष संजय मांजरखेडे, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष अमित चिद्दरवार यांच्यासह भाजपा पदाधिकाèयांसह कार्यकर्ते उपस्थित होते.