आई लवकरच भेटीन.. अर्जुन कपूरच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

05 Feb 2026 11:27:52
मुंबई,
Arjun Kapoor emotional post, अभिनेता अर्जुन कपूर आपल्या आई मोना शौरी कपूर यांच्या किती जवळ होता, हे कोणापासून लपलेले नाही. आईच्या आठवणींना उजाळा देत तो अनेकदा सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत असतो. आईविना आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकत नाही, असे त्याने वारंवार व्यक्त केले आहे. आता आईच्या जन्मदिनी अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या खास पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र या पोस्टमधील शब्दांनी त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
 

 Arjun Kapoor emotional post 
आईच्या जन्मदिनी अर्जुन कपूरने लिहिले, “जन्मदिनाच्या शुभेच्छा आई. आज मला तुझी खूप आठवण येतेय. सध्या आयुष्य माझ्याशी फार क्रूरतेनं वागतेय. पण ठीक आहे. मी या आव्हानांना धैर्याने तोंड देतोय आणि पुन्हा उठून उभा राहतोय, कारण तू मला अडचणींना धैर्याने कसं तोंड द्यायचं हे शिकवलं आहेस. या संपूर्ण प्रवासात आपला आदर आणि प्रामाणिकपणा कसा टिकवून ठेवायचा, हेसुद्धा तू मला शिकवलंस. या प्रवासात आपण एकत्र असू. तुला मी लवकरच भेटेन. एक दिवस आपण एकत्र मिळून तुझा जन्मदिन साजरा करू. तुझा प्रेमळ मुलगा.”
 
 
या पोस्टमधून अर्जुनचं आईवरचं Arjun Kapoor emotional post,  प्रेम आणि तळमळ स्पष्टपणे दिसून येते, मात्र “आयुष्य माझ्याशी फार क्रूरतेनं वागतेय” आणि “तुला मी लवकरच भेटेन” या ओळींमुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अर्जुन सध्या आयुष्यातील कोणत्या तरी कठीण टप्प्यातून जात असल्याचा अंदाज नेटकरी त्याच्या पोस्टवरून व्यक्त करत आहेत.काही सोशल मीडिया युजर्सनी या पोस्टची तुलना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टशी केली आहे. सुशांतने 3 जून 2020 रोजी आईसाठी लिहिलेली पोस्ट शेवटची ठरली होती. त्या पोस्टमध्येही त्याने आईबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर 14 जून 2020 रोजी तो मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला होता. याच संदर्भामुळे अनेक युजर्स अर्जुन कपूरबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.
अर्जुन कपूर हा निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत मोना शौरी कपूर यांचा मुलगा आहे. 2012 मध्ये कॅन्सरमुळे मोना कपूर यांचे निधन झाले. त्यानंतर बोनी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी दुसरे लग्न केले. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे अर्जुनच्या आयुष्यात मोठा भावनिक संघर्ष निर्माण झाला. लहानपणी स्थूलतेची समस्या, आई-वडिलांमधील ताणलेले संबंध, घटस्फोट आणि कुटुंबातील बदल यांचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला.चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतरही अर्जुन कपूरच्या वाट्याला अपेक्षित यश फारसे आले नाही. हिटपेक्षा फ्लॉप चित्रपटांची संख्या अधिक राहिली. सोशल मीडियावर त्याला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. त्यातच वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री मलायका अरोरासोबतच्या नात्याचा अंत झाल्याने तो आणखी एकटेपणाला सामोरा गेला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आईच्या जन्मदिनी केलेली अर्जुन कपूरची भावनिक पोस्ट ही केवळ आठवणींची अभिव्यक्ती नसून, त्याच्या आयुष्यातील संघर्ष आणि वेदनांचेही प्रतिबिंब असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ही पोस्ट वाचून चाहते त्याच्या मानसिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.
Powered By Sangraha 9.0