महाबीज संचालकपदी डॉ.सपकाळ आणि देशमुख यांची बिनविरोध निवड

    दिनांक :05-Feb-2026
Total Views |
तीन अर्जदारांनी घेतली माघार
 
अकोला
Dr. Sapkal and Deshmukh appointed as Mahabeej directors महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या दोन संचालकांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली.महाबीजच्या भाग १ आणि भाग २ मतदारसंघातील संचालकांसाठी आलेल्या पाच अर्जांपैकी गुरुवारी निवडणुकीपूर्वी तीन अर्जदारांनी आपले अर्ज मागे घेतले.त्यामुळे संचालकपदी डॉ.रणजीत सपकाळ आणि वल्लभराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
mahabeej
 
Dr. Sapkal and Deshmukh appointed as Mahabeej directors महाबीज च्या निवडणुक प्रक्रियेत गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख होती.यामध्ये महामंडळाचे हीत लक्षात घेवून विभाग-१ मधून माजी संचालक नानासाहेब देशमुख यांनी तर विभाग-२ मधून अॅड. विष्णुपंत सोलंकी व भुषण देशमूख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामूळे वल्लभराव देशमुख व डॉ.रणजित सपकाळ यांची आज महामंडळाचे शेतकरी भागधारकांमधून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) संचालकपदी अविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा महाबीज संचालक निवडणूक अधिकारी विनय वर्मा यांनी उपस्थित मान्यवर तसेच भागधारक यांचे समक्ष केली.या प्रसंगी महाबीजचे प्रगतीकरीता तसेच भागधारक व बिजोत्पादक यांच्या हिताकरीता आमचे नेहमीच प्राधान्य असेल असी ग्वाही नवनियुक्त संचालक वल्लभराव देशमुख व डॉ. रणजित सपकाळ यांनी दिली.तसेच नवनियुक्त संचालक डॉ. रणजित सपकाळ यांनी महाबीज बिजोत्पादकांना सन २०२४-२५ वर्षातील भाव फरकाची १७ कोटी रक्क्म लवकरच वितरीत होईल असे जाहीर केले. महाबीज संचालक पदावर वल्लभराव देशमुख यांची ही सातवी वेळ असून डॉ. रणजित सपकाळ यांची दुसरी वेळ आहे.