विदर्भ साहित्य संघाची निवडणूक ही साहित्यिकांची

05 Feb 2026 21:20:46
डॉ. श्रीपाद जोशी यांची पत्रपरिषदेत स्पष्ट भूमिका

नागपुर, 
विदर्भ साहित्य संघाच्या नव्या कार्यकारिणीसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीला रोज रंग चढत आहे. साहित्य क्षेत्राबाहेरील व्यक्ती या निवडणुकीत सहभागी होत असल्याने त्यावर जाहीर आक्षेप घेत ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक Dr. Shripad Joshi डॉ. भालचंद्र जोशी यांनी आज पत्रपरिषद या निवडणुकीत साहित्य क्षेत्राबाहेरील व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली.
 

joshi 
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विदर्भाचे योगदान मोठे असल्याचे सांगताना ते म्हणाले, विभागीय साहित्य संस्थांनी मराठीचे प्रश्न सातत्याने मांडणे गरजेचे आहे. पत्रपरिषदेला डॉ. शरद निंबाळकर, विनोद देशमुख, विलास देशपांडे, अतुल भुसारी, प्रमोद भुसारी यासह जोशी पॅनल मधील कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
संकुलाची जबाबदारी स्थायी समितीची
विदर्भ साहित्य संघाचे धूळखात असलेले रंगमंदिर कसे सुरू करता येईल हा कळीचा मुद्दा असून तो यंदाच्या निवडणुकीत अजेंड्यावरही आहे. ते वापरात आणण्यासाठी एकूणच सद्यस्थितीचा आढावा घेऊन अनुभवी व तज्ञ लोकांची समिती नेमून मार्ग शोधणे हा आमचा अजेंडा असल्याचे यावेळी संगितले. परंतु ही वास्तु धुळखात असताना अनेक वर्षे डॉ. जोशी देखील कार्यकारिणीत होते. याचे उत्तर देताना डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले की, ही जबाबदारी सांस्कृतिक संकुल स्थायी समितीची असते. अध्यक्षीय कार्यकारिणीचा यात काहीही हस्तक्षेप नसतो.
प्रमोद भुसारी जोशीच्या गटात ?
Dr. Shripad Joshi डॉ. जोशींच्या कार्यकारिणीत या निवडणूकीत अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले भुसारी देखील पत्रपरिषदेला संबोधित करीत होते. त्यामुळे ते निवडणूक लढतील की अर्ज मागे घेतील हा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता याचे उत्तर ९ फेब्रुवारीला मिळणार असल्याचे सूचकपणे डॉ. जोशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रमोद भुसारी यांनी अध्यक्षपदाचा अर्ज वि. सा संघाच्या निवडणूक अधिकार्‍यांशी वाद घालून तीन प्रतीत सादर केला
Powered By Sangraha 9.0