मुंबई,
Heavy rain राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात थंडीच्या पारंपरिक लक्षणांचा अभाव असून उकाड्याची तीव्रता वाढत असल्याचे निरीक्षण झाले आहे. डिसेंबर महिन्यात थंडी कायम राहिली होती; मात्र, 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या पावसामुळे राज्यातील हवामानात सतत बदल दिसत आहेत. ढगाळ वातावरण, उकाडा आणि पावसाचा अनुभव एकाच वेळी येत असल्यामुळे नागरिकांचे दिवसचर्या प्रभावित होत आहेत.
उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र कडाक्याची थंडी कायम असून, पारा सातत्याने घसरत आहे. हरियाणाच्या हिस्सारमध्ये देशातील कमी तापमानाची नोंद झाली असून येथे 4.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील धुळ्यात 10.4 अंश सेल्सिअस आणि रत्नागिरीत 34.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. यावरून स्पष्ट दिसते की राज्यातील हवामानात चढउतार वाढले आहेत.हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असून वायू प्रदूषण देखील चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाऊस येणार?
हवामान खात्याने Heavy rain येत्या 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसह जम्मू-काश्मीर, लडाख, पुद्दुचेरी, रायलसीमा आणि माहे या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. केरळमध्येही पाऊस सुरू असून, तामिळनाडू आणि आसपासच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा आहे.
देशातील काही भागात थंडी, उकडा आणि पावसाची एकत्रित स्थिती दिसत आहे. यामुळे हवामान बदलाचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर जाणवत आहे, तर उकाडा आणि वायू प्रदूषण आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे.