अखेर पवार फुटले म्हणाले सुनेत्राच्या उपमुख्यमंत्रीपदावर 'मी आनंदी'

05 Feb 2026 15:41:51
बारामती,
Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदावर शपथ घेण्याची घटना अत्यंत स्वागतार्ह असल्याचे सांगितले आहे. बारामतीतील गोविंदबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत आपली समाधान व्यक्त करताना म्हटले की, “सुनेत्रा पवार यांना संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.”
 
 

Sharad Pawar  
अजित पवार यांच्या Sharad Pawar  अकाली निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत शपथविधी पार पडल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केल्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी भाष्य करण्यास टाळाटाळ केली. ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आम्ही सध्या मोठ्या संकटातून जात आहोत. या परिस्थितीत एकमेकांना धीर देणे आणि पुढे कसे जावे, यावर आमचे लक्ष केंद्रीत आहे. कोणत्याही राजकीय निर्णयावर सध्या कुणाशी चर्चा सुरू नाही.”अजित पवार यांच्या स्मारकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “ज्या संस्थेच्या जागेची चर्चा सुरू आहे, त्या संस्थेचे अध्यक्ष मी आहे. त्यामुळे मला माहिती असायला हवी. अद्याप याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. सर्व विश्वस्त एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. सध्या स्मारकावर चर्चा करणे योग्य नाही.”
 
 
विमान अपघाताविषयी Sharad Pawar  काही नेत्यांकडून व्यक्त केल्या जात असलेल्या शंका विचारल्यावर पवार यांनी सांगितले की, “मी सुरुवातीलाच सांगितले आहे, अधिकृत माहिती येईपर्यंत उगीच शंका घेणे योग्य नाही.”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या विधानावर शरद पवारांनी जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, “या विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेच नव्हते. मग माझ्याबद्दल उल्लेख करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, हे मला समजत नाही.”केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत पवार म्हणाले की, “सामान्य माणसाला यातना होईल, असा नवा कर टाळण्यात आला आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र देशाच्या विकासाला गती देणारी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती.”अमेरिका-भारत करारासंदर्भात त्यांनी सांगितले की, “अमेरिकेने भारतावर कर आकारणीत काही प्रमाणात कपात जाहीर केली आहे. मात्र या कराराचे संपूर्ण चित्र काही दिवसांत समोर येईल. अमेरिकेकडून कृषी क्षेत्रातील निर्यातीसंदर्भात जी तरतूद जाहीर झाली आहे, ती भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.”माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या लेखनाचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी केल्याबाबत पवार म्हणाले, “तो विरोधी पक्षनेत्याचा अधिकार आहे. लष्करप्रमुखांनी काही लिहिले असेल, तर त्यावर चर्चा होणे गरजेचे होते. यामुळे देशासमोरील वास्तव चित्र लोकांसमोर आले असते.”
Powered By Sangraha 9.0