पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई

05 Feb 2026 18:29:01
पुणे,
Maharashtra water shortage यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्या असूनही राज्याच्या अनेक भागात पाणी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पुणे, बुलढाणा आणि ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरसारख्या भागांमध्ये नागरिक पाण्यासाठी झळसत असून महिलांचे हंडे मोर्चे निघाल्याची घटना उघड झाली आहे. पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास उन्हाळ्यात ही टंचाई आणखीन गंभीर स्वरूप धारण करेल, अशी चिन्हे आत्तापासूनच दिसत आहेत.
 

Maharashtra water shortage 
बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून Maharashtra water shortage सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची समस्या भयंकर बनली आहे. गावात महाजल आणि जलजीवन योजनेसह कोट्यवधी रुपये खर्च झाले असूनही नियमित पाणी पुरवठा होत नाही. महिलांनी आपल्या दोन महिन्यानंतर पाणी मिळत असल्याचे सांगितले आणि आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. याबाबत शेकडो महिला जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात धडकल्या आणि आपली कैफियत मांडली.
 
 
उल्हासनगर शहरात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा नाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कॅम्प 5 परिसरातील रहिवासी राजाराम पवार यांनी संताप व्यक्त करत अर्धनग्न अवस्थेत बाईकवरून पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यातील प्रभाग १ Maharashtra water shortage मधील कळस, गणेशनगर आणि बोपखेल परिसरात नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ते रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी आरोप केला की, पाणीपुरवठा जाणूनबुजून अडवला जात असून काही समाजकंटक दिशाभूल करणारे मेसेज पसरवत आहेत. त्यांनी पाणीटंचाईस कारणीभूत असलेल्या वॉल्वमनवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.गणेशनगरमधील ३ ते ७ नंबर गल्लीला दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा होत नाही, तर प्रभाग – १ धानोरी–कळस–लोहगाव परिसरातील नागरिक पाणीपुरवठ्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. महिलांनी चेतावणी दिली की, पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास सोमवारी आळंदी रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
गाव आणि शहरातील नागरिकांनी पाणी ही मूलभूत गरज असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0