मनोज जरांगे पाटील यांच्यावर घातपात?

    दिनांक :05-Feb-2026
Total Views |
जालना,
Manoj Jarante Patil मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर घातपात करण्याचा प्रयत्न प्रकरणातील संशयीत आरोपी अमोल खुणे याच्या जामिनावर सुटकेनंतर सुरू झालेल्या वादाचे नवीन वळण घडले आहे. जामिनावर सुटल्याच तासांमध्ये खुणे यांनी जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती आणि या प्रकरणातील नार्को टेस्ट तसेच एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी खुणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोपही केले होते.
 

Manoj Jarante Patil  
याबाबत आता मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “अमोल खुणेच्या अर्जाची अंमलबजावणी करून दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्यावे. हे सगळं धनंजय मुंडे हेच घडवून आणत आहेत. खुणे हा जर खरा असेल, तर पाचही लोकांच्या धनंजय मुंडेसह नार्को टेस्ट करायला हवी होती.”जरांगे पाटील यांनी खुणेवर निशाणा साधत म्हटले की, “खुणेच्या आईने आणि पत्नीने सांगितले होते की तो पीत आहे. हा पोरगा असा आहे की स्वतः सुखाने खायचा नाही आणि घरच्यालाही सुखाने तुकडे खाऊ द्यायचे नाही. त्याला कोणीतरी फुस लावले असेल, म्हणून मी पोलीस अधीक्षकांना सांगितले होते. त्याने माझ्यावर आरोप केले ते सिद्ध करावे लागतील, नाहीतर पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत.”
याशिवाय जरांगे पाटीलManoj Jarante Patil  यांनी खुणेला टोला मारत, “दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करण्यासाठी तू आपल्या जातीला डाग लावतोस का?” असा सवालही उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केले की आंदोलनाबाबत सर्व माहिती त्यांच्याकडे आहे आणि योग्य वेळ आल्यावर ते सर्व बाहेर येईल.मनोज जरांगे पाटील यांची ही भेट आणि खुलासे प्रकरणाच्या पुढील तपासाला महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.