सॉफ्टबॉल स्पर्धेत अमरावती विद्यापीठ अव्वल

    दिनांक :05-Feb-2026
Total Views |
अ. भा. आंतर विद्यापीठ स्पर्धा
 
अमरावती,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली आयोजित ’अखिल भारतीय आंतर विद्यापीठ softball tournament सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळविला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला सुवर्ण पदक, माधव विद्यापीठ - पिंडवारा राजस्थानने रजत पदक, कालिकत विद्यापीठाने कांस्य पदक व महाराजा सुरजामल ब्रिाज विद्यापीठ - भरतपूरने कांस्य दक पटकाविले. यावेळी ट्रॉफी व पदके देवून चमूंना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष अ‍ॅड. गजानन पुंडकर, उपाध्यक्ष केशव मेतकर, सचिव डॉ. व्ही. जी. ठाकरे, महाराष्ट्र सॉफ्ट बॉल असोसिएशनचे सहसचिव सुरजसिंह येवतीकर, प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत, डॉ. रुपाली इंगोले आदी उपस्थित होते.
 
 
soft
 
कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले, येणा-या जागतिक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना या softball tournament स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकावर राहिलेल्या संघांमधील गुणवान खेळाडूंचा प्राधान्याने विचार करावा. भविष्यात जागतिक स्तरावरील निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी अमरावती विद्यापीठ सदैव सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भरतपूर संघाचे प्रशिक्षक अभिषेक व कालिकत विद्यापीठाचे मोहम्मद अली यांनी मनोगत व्यक्त करतांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने राहण्याची व प्रवासाची उत्तम सोय केल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व पंचांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट टिचर पुरस्कार जगदीश (माधव विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ कॅचर रोहित सहारे (अमरावती विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ बेसमॅन सोनू गुजर (भरतपूर), लेखराज व राजपुत (माधव विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ शॉटअप जितेंद्र (कालिकत विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ राईट फिल्डर अभिषेक (कालिकत विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ सेंटर फिल्डर रोहन पोटे (अमरावती विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ लेफ्ट फिल्डर जयपाल (भरतपूर विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर कॅप्टन ऋतिक पुडवे (अमरावती विद्यापीठ) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संचालन डॉ. दिनेश खेडकर व डॉ. रेखा मग्गीरवार यांनी केले. आयोजनाससाठी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षक डॉ. कविता वाटाणे, सर्व शारीरिक शिक्षक तसेच विद्यापीठ शारीरिक शिक्षक विभागातील संतोष वानखडे, अरुण लोहे, अब्दुल तौसिफ आदिंनी परिश्रम घेतले. समारोप कार्यक्रमाला स्पर्धेचे मुख्य परिक्षक मुकुंद देशपांडे, महाविद्यालयातील शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.