अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? ९ फेब्रुवारी महत्वाची

    दिनांक :05-Feb-2026
Total Views |
बारामती,  
sunetra-pawar-jit-pawar माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या पुढील भूमिकेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीनंतरच महाराष्ट्रासमोर आपली भूमिका मांडणार आहेत. या निर्णयामुळे राजकारण्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचे लक्ष सुनेत्रा पवारकडे लागले आहे.

sunetra-pawar-jit-pawar 
 
सुनेत्रा पवार  ९ फेब्रुवारीपर्यंत बारामतीतच राहणार आहे. या कालावधीत कोणत्याही राजकीय मंचावर सक्रिय होणार नाहीत किंवा माध्यमांसमोर आपली भूमिका मांडणार नाहीत, असे सांगितले जात आहे. बारामती हे पवार कुटुंबाचे राजकीय केंद्र मानले जाते, त्यामुळे येथेच त्यांनी आपली पुढील दिशा ठरवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत दिवंगत अजित पवार यांच्या निधनाच्या १२ दिवस पूर्ण होणार आहेत. sunetra-pawar-jit-pawar त्यामुळे घरातील शोक संपल्यानंतरच सुनेत्रा पवार आपली राजकीय भूमिका मांडणार आहेत, असे दिसते. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा केवळ बारामतीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात लागून राहिली आहे.