नवी दिल्ली,
surrender order बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चेक बाऊन्स प्रकरणात खालच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आणि सरेंडरच्या आदेशाला आव्हान देत त्यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेली याचिका मंगळवारी फेटाळून लावण्यात आली. याचिकेवरील सुनावणीनंतर हायकोर्टाने राजपाल यादव यांना आजच सरेंडर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
राजपाल यादव surrender order यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्या युक्तिवादांना मान्यता न देता याचिका फेटाळून लावली. राजपाल यादव सध्या मुंबईत असल्याचे कारण पुढे करत सरेंडरसाठी वेळ देण्याची मागणी करत होते. यावर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची मुदत दिली असल्याचे समजते आहे. मात्र यापुढे कोणतीही सवलत देण्याचे ठोस कारण दिसत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, याआधीच पुरेसा वेळ देण्यात आला असून आता मुदतवाढ देण्याचे कारण नाही. राजपाल यादव यांच्याकडून आणखी एका आठवड्याची मुदत मागण्यात आली होती. एका आठवड्याची संधी मिळाल्यास संपूर्ण रक्कम अदा करता येईल, असा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला. मात्र हायकोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावत कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
याचिका फेटाळण्यात आल्याने आता राजपाल यादव यांना सरेंडर करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हे प्रकरण दिल्लीस्थित मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीने राजपाल यादव यांच्या कंपनीला चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक मदत दिली होती. मात्र पैसे परत करण्यासाठी देण्यात आलेले अनेक धनादेश बाऊन्स झाल्याचा आरोप तक्रारदार कंपनीने केला आहे. यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत राजपाल यादव आणि त्यांच्या कंपनीविरोधात खटला दाखल करण्यात आला.
या खटल्याच्या surrender order सुनावणीदरम्यान करकडडूमा न्यायालयाने राजपाल यादव यांना अनेक वेळा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र ते बराच काळ न्यायालयात हजर न राहिल्याने, २०१३ मध्ये त्यांना १० दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ३ ते ६ डिसेंबर २०१३ या कालावधीत ते चार दिवस तुरुंगात होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अपीलवरील सुनावणीदरम्यान त्यांची शिक्षा तात्पुरती स्थगित केली होती.दरम्यान, चेक बाऊन्ससारख्या प्रकरणांमध्ये न्यायालयाला दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन करणे ही गंभीर बाब असल्याचे निरीक्षण न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे. आता हायकोर्टाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने राजपाल यादव यांच्यासाठी पुढील दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.