एमएसएमई उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा कर्ज मेळावा आज

06 Feb 2026 21:34:26
यवतमाळ : Central Bank Loan mela  एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाअंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी येथे विशेष एमएसएमई कर्ज उपलब्धता कार्यक्रम होत आहे. सेंट्रल बँक क्षेत्रीय कार्यालय व एमआयडीसी असोसिएशनच्या पुढाकारात कार्यक्रमाचे आयएमए सभागृह, लोहारा, यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
money
 
Central Bank Loan mela  मार्गदर्शक सेंट्रल बँकेचे महाव्यवस्थापक हेमंत शर्मा, जिल्हा उद्योग केंद्र महाप्रबंधक सुशील गरुड, एमआयडीसी असोसिएशन उपाध्यक्ष महेश अग्रवाल, सचिव डॉ. आनंद भुसारी राहतील. यावेळी एमएसएमई कर्ज सुविधा, मुद्रा योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, महिला उद्योजकांसाठी विशेष योजना, डिजिटल पेमेंट व उद्यम नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळेल. अधिक माहितीसाठी नजीकच्या सेंट्रल बँक शाखेशी किंवा 7507774165 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0