चर्चांना उधाण एल्विश यादवचा नवा 'कारनामा' समोर

06 Feb 2026 11:21:02
मुंबई,
Elvish Yadav लोकप्रिय यूट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी’ विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एल्विशने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्याने अभिनेत्री जिया शंकरसोबत गुपचूप साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
 

Elvish Yadav 
एल्विश यादवने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो एका मुलीचा हात धरलेला दिसत आहे. या फोटोमध्ये मुलीच्या हातात मोठ्या हिऱ्याची अंगठी स्पष्टपणे दिसत असून, एल्विशने त्या पोस्टमध्ये अभिनेत्री जिया शंकरला टॅग केले आहे. त्याने लिहिले की, “मी प्रेमाला दुसरी संधी दिली आणि मला पुन्हा प्रेम मिळाले.” या कॅप्शननंतर एल्विशने साखरपुडा केल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
 
 
 
विशेष म्हणजे, जिया Elvish Yadavशंकरनेही हाच फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत एल्विशची पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. मात्र, एल्विश किंवा जिया यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा साखरपुडा खरोखरच झाला आहे की एखाद्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी हा स्टंट आहे, याबाबत सध्या संभ्रम कायम आहे.एल्विश यादव यापूर्वी ‘लाफ्टर शेफ्स’ या शोमध्ये अनेक वेळा तो लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत देत होता. त्याच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती असल्याचे त्याने सूचक विधान केले होते, मात्र नाव उघड केले नव्हते. त्यामुळे आता समोर आलेल्या फोटोमुळे चाहत्यांच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. २८ वर्षीय एल्विशपेक्षा जिया शंकर वयाने दोन वर्षांनी मोठी आहे.
 
 
 
एल्विश यादवच्या Elvish Yadav वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर, यापूर्वी त्याचे नाव अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मनीषा राणी, कीर्ती मेहरा, अंजली अरोरा, उर्वशी रौतेला आणि अलीकडेच अभिनेत्री जन्नत जुबैरसोबत त्याच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. जन्नत जुबैरसोबत त्याने एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते आणि ‘लाफ्टर शेफ्स ३’मध्येही ते एकत्र झळकले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते.दरम्यान, जिया शंकरचे नावही याआधी ‘बिग बॉस ओटीटी २’ फेम अभिषेक मल्हानसोबत जोडले गेले होते. दोघे एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले असले, तरी त्यांनी केवळ मैत्री असल्याचे स्पष्ट केले होते. काही काळापूर्वी जियाने एका ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो शेअर करत तिच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती असल्याचे संकेत दिले होते. तोच व्यक्ती एल्विश यादव असू शकतो का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.एल्विश यादवच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. मात्र, साखरपुड्याबाबत अधिकृत पुष्टी नसल्याने ही बातमी खरी की केवळ चर्चेचा भाग, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत एल्विश यादव आणि जिया शंकर यांच्या नात्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Powered By Sangraha 9.0