लाडक्या बहिणींना शेवटची संधी खात्यात १५०० रुपये नक्की येणार!

e-KYC मध्ये महिलांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत दुरुस्ती करावी

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
मुंबई,
mazi ladaki bahin yojana राज्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या योजनेत अर्ज केलेल्या काही महिलांनी e-KYC प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी किंवा दुर्लक्षामुळे चुकीची माहिती भरण्याची चूक केली होती. आता अशा लाभार्थ्यांना आपले अर्ज ऑनलाइन सुधारण्याची अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 

mazi ladaki bahin yojana 
योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर mazi ladaki bahin yojana  २०२५ पर्यंत अनेक महिलांनी e-KYC पूर्ण केले होते. मात्र, अर्ज भरताना ‘कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे किंवा निवृत्तीवेतन घेत आहे’ या पर्यायात अनेक लाभार्थ्यांकडून चुकीची माहिती भरल्यामुळे काही अर्ज अपात्रतेच्या धोक्यात आले होते. जिल्हाधिकारी स्तरावर याची पडताळणी सुरू असली तरी, प्रक्रियेला वेग देण्यासाठी शासनाने ऑनलाईन सुधारणा करण्याची सोय केली आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार, अशा महिलांना ३१ मार्च २०२६ पर्यंत पोर्टलवर जाऊन e-KYC मधील ही सुधारणा करता येईल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही अंतिम संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत, ज्याद्वारे अर्जदार महिलांना सोपी व जलद सुधारणा करता येईल.
 
 
 
लाभार्थींनी mazi ladaki bahin yojana  आपला अर्ज वेळेत सुधारल्यास आपल्या योजनेचा लाभ सुरळीत सुरू ठेवता येईल. अधिक माहितीसाठी [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.शासनाचा हा निर्णय लाभार्थी महिलांसाठी मोठा दिलासा ठरतो, कारण चुकीच्या माहितीनिमित्त त्यांच्या अर्जांचे पात्रत्व धोक्यात आलेले होते. आता ऑनलाईन सुधारणा सोयीमुळे अर्जदार महिलांना आपले हक्क मिळवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.