पुणे,
India armed forces telemedicine, देशाच्या अतिदुर्गम भागातील जवान आता तज्ज्ञ डॉक्टरांचा मार्गदर्शन थेट मिळवू शकतील, अशी सुविधा सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत (एएफएमएस) सुरू झाली आहे. ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’च्या (एबीडीएम) अंमलबजावणीसह ही सेवा डिजिटल क्रांतीचा मार्ग दाखवणार आहे, तर इस्रोच्या उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग करून टेलिमेडिसिन प्रणालीचा विस्तार केला जात आहे.
पुण्यातील सशस्त्र सेना India armed forces telemedicine वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) नुकतीच संपन्न झालेली ‘आर्मेडिकॉन २०२६’ परिषदेत महासंचालक व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लष्करी वैद्यकीय सेवा अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि रुग्णकेंद्रित बनवण्याच्या उद्देशाने आता लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्या वैद्यकीय नोंदी व व्यवस्थापन ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टिम’ (एचआयएमएस) या एकात्मिक डिजिटल मंचावर आणण्यात येत आहेत. यामुळे जवानांची आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होईल आणि उपचारांमध्ये सातत्य राखणे सुलभ होईल.देशाच्या दुर्गम भागात इस्रोच्या ‘स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर’च्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या टेलिमेडिसिन सुविधेमुळे सीमेवरील जवान थेट शहरातील लष्करी रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधू शकतील. या प्रणालीचा झपाट्याने विस्तार केला जात असून आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सरीन यांनी स्पष्ट केले.
विषाणू संवर्धन प्रयोगशाळा
याशिवाय, सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) अत्याधुनिक प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तातडीने संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी ‘बीएसएल-२’ या राज्यस्तरीय विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा उभारण्यात आली असून ‘विषाणू संवर्धन प्रयोगशाळा’ही कार्यरत आहे. या प्रयोगशाळांमुळे प्रभावी लस आणि उपचार विकसित करण्यासाठी आवश्यक संशोधन करता येणार आहे. राष्ट्रीय ‘वन हेल्थ’ आराखड्यांतर्गत या सुविधा देशाच्या आरोग्य सुरक्षेचे कवच ठरतील.व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), स्वदेशी तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतींचा समन्वय करून भारतीय सशस्त्र दलाची वैद्यकीय सेवा भविष्यातील कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास तयार आहे.या डिजिटल व प्रयोगशाळा सुविधा लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्या जवानांसाठी आरोग्यसेवा अधिक सुरक्षित, सुलभ India armed forces telemedicine आणि प्रभावी करण्यास महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास आहे.