'वेरी गुड क्या बात है' मराठीचा मान उंचावला २५ कोटींचा टप्पा पार!

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
मुंबई,
KrantiJyoti Vidyalaya Marathi Medium film मराठी माध्यमाच्या शाळेची अस्मिता, शिक्षक-विद्यार्थी नात्याची भावनिक गुंफण आणि वास्तवाशी जोडलेला आशय यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या भरीव यशानिमित्त चित्रपटाच्या टीमतर्फे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, तांत्रिक टीमसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.
 

KrantiJyoti Vidyalaya Marathi Medium film 
समारंभात चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना निर्माते आणि दिग्दर्शकांनी संपूर्ण टीमचे तसेच प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. याच वेळी प्रेक्षकांसाठी दोन मोठ्या सरप्राईज घोषणाही करण्यात आल्या. सुपरहिट ठरलेल्या ‘झिम्मा’ फ्रँचायझीचा पुढील भाग ‘झिम्मा ३’ आणि ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 
 
चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले की, हा चित्रपट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. २५ कोटींचा टप्पा गाठणे ही संपूर्ण टीमच्या मेहनतीची आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे आभार मानत, रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत व्यक्त करणे अशक्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याच प्रेमामुळे अधिक प्रामाणिक आणि आशयघन चित्रपट घेऊन येण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
 
 
या चित्रपटात सचिन खेडेकर, KrantiJyoti Vidyalaya Marathi Medium film अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर, प्राजक्ता कोळी आणि हरीश दुधाडे यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील भावनिक नाते, मराठी शाळेच्या आठवणी जागवणारे प्रसंग आणि सामाजिक वास्तव मांडणारी कथा यामुळे हा चित्रपट केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नाही, तर अनेक प्रेक्षकांसाठी भावनिक अनुभव ठरला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाची निर्मिती चलचित्र मंडळी यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग या चित्रपटाच्या निर्मात्या असून सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे. २५ कोटींच्या यशानंतर आणि आगामी दोन चित्रपटांच्या घोषणांमुळे या टीमचा प्रवास आता नव्या उंचीवर पोहोचताना दिसत असून, प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.