तुमच्या खात्यात येणार का ६००० रुपये? 2 मिनिटांत करा चेक

२२ व्या हफ्त्याची आतुरता

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
मुंबई,
PM Kisan Yojna 22nd Installment राज्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. शेतीवरील वाढता खर्च लक्षात घेतल्यास ही मदत अनेक शेतकरी कुटुंबांसाठी दिलासादायक ठरते.
 

PM Kisan Yojna 22nd Installment 
सध्या 22 व्या हप्त्याची PM Kisan Yojna 22nd Installment  अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, केंद्र सरकारकडून लवकरच हा हप्ता जमा होईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा वाढत आहेत. मात्र हप्ता मिळण्याआधी प्रत्येक शेतकऱ्याने आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील लाभार्थी यादी ऑनलाइन पाहता येते. पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (pmkisan.gov.in) “लाभार्थी यादी” या पर्यायावर क्लिक करून राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक व गाव निवडल्यास गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसते.मागील काही महिन्यांत देशभरात लाभार्थी यादीचे पुनरावलोकन करण्यात आले. या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. यामागे अनेक कारणे आहेत. एका कुटुंबातील पती-पत्नी दोघेही स्वतंत्र लाभ घेत असल्याचे आढळल्यास नियमांनुसार फक्त एका सदस्याला लाभ मिळू शकतो. तसेच काही ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या नावावर हप्ते जमा झाल्याचे दिसून आले, जे नियमभंगाचे ठरले.
 
 

ई-केवायसी पूर्ण करा...
शेतकऱ्यांना हप्ता मिळवण्यासाठी PM Kisan Yojna 22nd Installment  आपली ई-केवायसी पूर्ण आहे का, बँक खाते आधारशी जोडले आहे का आणि आपले नाव लाभार्थी यादीत आहे का, याची तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे. आवश्यक दुरुस्त्या वेळेत केल्यास पुढील हप्त्याचा लाभ निश्चितपणे मिळू शकतो.शेतकऱ्यांनी आपली माहिती तपासून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात. यामुळे हप्त्याच्या वितरणात कोणतीही अडचण येणार नाही आणि आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.