सोनू सूदची भावनिक विनंती म्हणाले तीन बहिणींच्या मृत्यूने देश हादरला

डिजिटल व्यसनाविरोधात कडक आवाहन

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
मुंबई
Sonu Sood emotional appeal गाझियाबादमध्ये तीन तरुण बहिणींच्या मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला असून या हृदयद्रावक घटनेवर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत समाज आणि प्रशासनाला गंभीर आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ आणि पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, डिजिटल व्यसन आणि ऑनलाइन गेमिंगबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
 

Sonu Sood emotional appeal 
सोनू सूद यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या घटनेमागील कारणांवर भाष्य केले आहे. त्यांनी लिहिले की, “आज गाझियाबादमध्ये तीन तरुणींनी आपला जीव गमावला. त्यांचा मृत्यू हिंसाचारामुळे किंवा गरिबीमुळे नाही, तर ऑनलाइन गेमिंग आणि डिजिटल व्यसनाच्या अदृश्य दबावामुळे झाला आहे.” या शब्दांतून त्यांनी या घटनेबद्दलची तीव्र वेदना व्यक्त केली. पुढे त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की, शिक्षणाव्यतिरिक्त १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्यात यावी.अभिनेता पुढे म्हणाला की, मुलांना अल्गोरिदमपेक्षा मार्गदर्शनाची अधिक गरज आहे. हा मुद्दा कोणाला दोष देण्याचा नसून मुलांच्या सुरक्षिततेचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “जर आपण मुलांच्या संरक्षणासाठी आताच पावले उचलली नाहीत, तर खूप उशीर होईल. ही घटना आणखी एक विसरली जाणारी बातमी ठरू नये. आता कारवाई करण्याची वेळ आली आहे,” असे भावनिक आवाहन सोनू सूद यांनी केले.
 
 
 
या पोस्टसोबत सोनू सूद यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून, त्यात ते पालक आणि समाजाला १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगपासून दूर ठेवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकांनी त्यांच्या स्पष्ट आणि निर्भीड भूमिकेचे कौतुक केले आहे.विशेष म्हणजे, ऑनलाइन गेमिंग आणि डिजिटल व्यसनाच्या धोक्यांबाबत सोनू सूद यांनी यापूर्वीही आवाज उठवला होता. त्यांनी याआधीही अशा प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण आणण्याची मागणी केली होती. गाझियाबादमधील या दुर्दैवी घटनेनंतर त्यांचे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले असून, डिजिटल युगात मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे, याकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे.