आरोग्य विभागाच्या शिबिरात महिलेचा मृत्यू

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
सिकलसेल आजाराने होती ग्रस्त
 
चिखलदरा, 
Woman dies in health camp मेळघाटात सिकलसेल आजाराने थैमान घातले असून सध्या चिखलदरा तालुक्यात २०९ रुग्ण या आजाराने प्रत्यक्ष ग्रस्त आहेत तर त्याचे वाहक ३०८८ आहेत. दरम्यान, शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाने सिकलसेल आजाराच्या रुग्णांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये चिखलदरा तालुक्यातील चिखली गावातील ४२ वर्षीय द्रोपदी सुरेश पटोलकर ही महिला गावातील नागरिक व आशा स्वयंसेविका यांच्यासोबत शिबिराचा लाभ घेण्यासाठी आली होती. मात्र, शिबिरामध्ये पोहोचताच अचानक या महिलेला रक्ताच्या उलट्या झाल्या व जागीच मृत्यू झाला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
 
 
dads
 
Woman dies in health camp  या महिलेवर आरोग्य विभागामार्फत चार ते पाच वर्षापासून सिकलसेल आजाराचे औषधोपचार सुरू होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. चार-पाच वर्षापासून या महिलेला सिकलसेल आजार होता. शुक्रवारी चिखलदरा येथे आयोजित शिबिरात महिलांसाठी व रुग्णांसाठी शासनाकडून ज्या योजना चालतात, याची माहिती देण्यात येणार होती. या योजनेचा लाभ व दिव्यांग शिबिर यासाठी या शिबिरात या महिलेला आणले होते. मात्र, आल्याबरोबर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या व त्यांचा मृत्यू झाला. मागील तीन-चार वर्षापासून सिकलसेल आजाराचे औषध उपचार सुरू असल्याची माहिती आशा स्वयंसेविका जया खेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
(लोगो)