अजित पवारांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात 'भावनिक राजकारणाचे स्वरूप'

विकासकामांपेक्षा श्रद्धांजलीवर भर

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
पुणे
Zilla Parishad and Panchayat Samiti Elections माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामाचा माणूस म्हणून ओळखले जात होते. “मी कामाचा माणूस आहे, माझ्या कामाच्या जोरावर मत मागतो,” असे त्यांचे ठळक विधान त्यांच्या राजकीय ओळखीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले होते. विकासकामे, प्रशासकीय पकड़, निर्णयक्षमता आणि ठोस कार्यपद्धती यांच्या बळावर मतदारांसमोर उभे राहणे हीच त्यांची कायमची भूमिका होती. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय प्रचाराचे स्वरूप बदलत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
 

Zilla Parishad and Panchayat Samiti Elections  
जिल्हा परिषद आणि Zilla Parishad and Panchayat Samiti Elections पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून विकासकामांच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक आवाहनांवर अधिक भर दिला जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांकडून “राष्ट्रवादीला एक मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली” असा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रचार साहित्य, गावभेटी, बैठका आणि कार्यकर्त्यांच्या संवादात हा सूर ठळकपणे दिसत आहे.विरोधक पक्षांकडून या बदललेल्या प्रचारशैलीवर सूचक टीका होत असून, कामाचा वारसा सांगणाऱ्यांनी त्यांच्या कामाचे तपशील मांडावेत, अशी अप्रत्यक्ष मागणी व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक संवेदनशील झाले असले तरी, कामाच्या राजकारणातून भावनिक आवाहनांकडे झालेला हा कल कितपत परिणामकारक ठरेल, हा निकाल निकालाच्या दिवशीच ठरणार आहे.राजकीय वर्तुळात चर्चेचा एक मुद्दा असा आहे की, ही प्रचारपद्धत स्वतः अजित पवारांच्या राजकीय विचारधारेच्या विरोधात जात असल्याचे दिसते. अजित पवारांनी भावनिक लाटांवर स्वार होण्याऐवजी विकासकामांची मांडणी, आकडेवारी, निर्णयांची स्पष्टता आणि कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यावर नेहमीच भर दिला होता. त्यामुळे त्यांच्या नावावर आधारित भावनिक मतदान मागणे हे त्यांच्या राजकीय संस्काराशी विसंगत असल्याची भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
 
 
पुणे जिल्हा नेहमीच मुद्देसूद, Zilla Parishad and Panchayat Samiti Elections विचारपूर्वक आणि तुलनात्मक मतदानासाठी ओळखला जातो. सिंचन, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर आधारित राजकारण येथे प्रभावी ठरले आहे. अशा परिस्थितीत, भावनिक आवाहनांवर आधारित प्रचार कितपत यशस्वी ठरेल, याबाबत राजकीय विश्लेषक साशंकता व्यक्त करत आहेत.राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भावनिक संदेशांचा प्रभाव असला तरी, ठोस कामगिरीची मांडणी करण्याशिवाय मतदारांची जाणीवपूर्वक निवड बदलणे कठीण ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत या बदलत्या प्रचारशैलीचा परिणाम पाहणे उत्सुकतेस्पद ठरणार आहे.