धक्कादायक दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक

07 Feb 2026 12:49:26
पुणे,
CBI takes action पुण्यातील खडकी येथील मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (MES)मध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. कंत्राटदाराची प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईमुळे संरक्षण विभागाच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींची नावे सुनील निकम आणि सुरेश म्हस्के अशी आहेत.
 

CBI takes action 
तक्रारदार एका CBI takes action खाजगी कंपनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी असून ते MESची कंत्राटे राबवत आहेत. तक्रारीनुसार, त्यांनी सोपवलेली कामे वेळेत पूर्ण केली होती आणि त्याचे कम्प्लिशन सर्टिफिकेट देखील सादर केले होते; मात्र, त्यांचे बिल जाणीवपूर्वक रोखून ठेवले गेले होते. या देयके मंजूर करण्यासाठी निकम आणि म्हस्के यांनी ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.सीबीआयने या प्रकरणात सापळा रचला. तक्रारदाराने ३ फेब्रुवारी रोजी सीबीआयकडे धाव घेतली. तक्रारीची शहानिशा करून ६ फेब्रुवारी रोजी खडकी येथील कार्यालयात सापळा रचला. वाटाघाटीनंतर आरोपींनी लाचचा पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये स्वीकारले. ज्युनिअर इंजिनीअर सुरेश म्हस्के याला लाचेची रक्कम स्वीकारताना कार्यालयात पकडण्यात आले, तर या कटात सामील असिस्टंट गॅरिसन इंजिनीअर सुनील निकम यांनाही अटक करण्यात आली.
 
 
अटकेनंतर सीबीआयने दोन्ही आरोपींच्या कार्यालयाची आणि निवासी घरांची झडती घेतली. या झडतीदरम्यान १.८८ लाख रुपयांची संशयास्पद रोख रक्कम सापडली, ज्याचा आरोपींना कोणताही हिशोब देता आला नाही.याच दरम्यान सीबीआयने आणखी एका जुन्या प्रकरणात कारवाई केली आहे. २०१२ मधील ३.६३ कोटी रुपयांच्या पंजाब अँड सिंध बँक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी रेणू सक्सेना हिला उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक करण्यात आली आहे. २०१७ मध्ये न्यायालयाने तिला घोषित गुन्हेगार म्हणून जाहीर केले होते. रेणू सक्सेनाने बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या गृहकर्ज मंजूर करून घेतले होते.
Powered By Sangraha 9.0