शिंदेंचा शिलेदार संध्याकाळी राजीनामा देणार! राज्याच्या 'राजकारणात भूकंप'

07 Feb 2026 12:58:35
नाशिक,
Nashik Mayor नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची निवड करण्यात आली आहे. उपमहापौरपदी अचानक शिंदेसेनेचे विलास शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, जे बिनविरोध विजयी झाले आहेत.
 

Nashik Mayor 
सुरुवातीला उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप यांनी अर्ज भरण्यास तयारी दर्शविली होती. मात्र मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शिंदेसेनेला महापौरपद देण्याचा आदेश नाशिकमधील भाजप वरिष्ठांकडे आला. याआधी शिंदेसेनेकडून प्रवीण तिदमे, राहुल दिवे आणि विलास शिंदे यांनी उपमहापौरपदी अर्ज भरणे सुरू केले होते.
भाजप-शिंदे गटाची युती झाल्यानंतर प्रवीण तिदमे आणि मच्छिंद्र सानप यांनी आपले अर्ज मागे घेतले, ज्यामुळे विलास शिंदे बिनविरोध विजयी ठरले.या सर्व घडामोडीनंतर प्रवीण तिदमे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते आणि नवीन उपमहापौर विलास शिंदे यांच्यावर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता ते महापालिका आयुक्तांकडे नगरसेवकपदाचा राजीनामा देतील. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे नाशिक महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देतील, असे तिदमे यांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0