वेध
विजय कुळकर्णी
हिंदी पाठोपाठ आता Marathi movies मराठी चित्रपट निर्मात्यांनी देखील या समाजमाध्यमावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार केलेला दिसत आहे. ६ फेब्रुवारी रोजी ‘आता वेळ झाली’, हा मराठी चित्रपट अल्ट्रा झकास या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. २०-२५ वर्षांपूर्वी अमरावती, नागपूर, अकोला या विदर्भातील शहरांमध्ये मोठ्या संख्येत चित्रपटगृहे होती. अकोल्यात एकेकाळी १० चित्रपटगृहे होती. आज पाच ते ६ चित्रपटगृहे सुरू आहेत. आठवड्यातून दोन दिवसच चित्रपट दाखविले जात होते. तेही जुने असायचे. त्यामुळे चित्रपटगृहांत सिनेमा लागला की, पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्याची क्रेझ होती. तिकीट मिळविणे हा देखील मोठा अभिमानाचा विषय समजला जात होता. एखादा चित्रपट हिट झाला तर, तो कमीत कमी महिनाभर त्या चित्रपटगृहांतून उतरत नव्हता. शेगाव, काटेल कोलद, डव्हा, लोणी इत्यादी तीर्थक्षेत्रांच्या यात्रेत टुरिंग टॉकीज मोठ्या संख्येत येत होत्या. या चित्रपटगृहात निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याला प्राधान्य देत होते. मात्र, दादा कोंडकेंच्या मराठी चित्रपटांशिवाय इतर मराठी सिनेमांना रसिकांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, मोबाईल आले. सुरुवातीला मोबाईलने दूरध्वनी संचाची जागा घेतली. टेक्स मॅसेज पाठविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला.
Marathi movies क्रांती झाल्यावर आज प्रत्येकाच्या हाती अॅन्ड्रॉईड मोबाईल आहे. त्यावरून विविध प्रकारचे चॅनल्स सुरू झाले. चित्रपट देखील त्यावर डाऊनलोड करून बघता येतात. दूरचित्रवाणीवरूनही नव्याने प्रदर्शित झालेले चित्रपट काही दिवसांतच दाखविले जात आहेत. त्यामुळे चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहणे कमी झाले. प्रेक्षकांची संख्या कमी झाल्याने अनेक चित्रपटगृहे बंद पडली. चित्रपटगृहांच्या जागेवर मॉल व्यापारी संकुल उभारले जात आहेत. मल्टिफ्लेक्स उभारण्यात आले. पूर्वी चित्रपटांच्या रिळ तयार केल्या जात होत्या. आता सॅटेलाईटद्वारे थेट चित्रपटगृहांत चित्रपट दाखविले जात आहेत. या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे चित्रपट प्रदर्शनाचा खर्च कमी झाला असला तरी, तिकिटांचे दर वाढले आहेत. पत्नीला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जायचे तर, किमान एक हजार रुपये लागतात. युवक-युवती मोबाईलवर नवीन चित्रपट डाऊनलोड करून बघतात. त्यामुळे चित्रपटगृहांत जाऊन सिनेमा पाहणे टाळले जाते. इत्यादी कारणे निर्माते त्यांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याची असू शकतात. त्याचबरोबर मराठी चित्रपट निर्मात्यांना चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित करणे त्यांच्या बजेटमध्ये बसत नसावे. तसेही, मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत, अशी निर्माते, कलावंतांची ओरड असते. त्याचप्रमाणे ओटीटीवर चित्रपट केल्यास तो करोडो प्रेक्षकांपर्यंत जातो. हा देखील फायदा या माध्यमांचा होत असलेला पाहूनही मराठी चित्रपट निर्माते या माध्यमावर आपला चित्रपट प्रदर्शित करण्याकडे वळले असावेत. मराठी चित्रपट निर्मितीला महाराष्ट्र सरकार अनुदान देखील देते.
Marathi movies मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागे उद्देश आहे. पण, काही निर्माते टुकार चित्रपट काढून केवळ शासकीय अनुदान प्रयत्न करतात. त्यामुळे शासनाचा अनुदान देण्यामागचा उद्देश सफल होताना दिसत नाही. चित्रपटापासून शासनाला करमणूक कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. मात्र, सिनेमा निर्मितीचा उद्देश केवळ अनुदान मिळविणे एवढाच असेल तर, चित्रपट देखील दर्जाहीन केला जातो. त्यामुळे शासनाचा उद्देश सफल होत नाही. तेव्हा, प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहात आले पाहिजे यासाठी दर्जेदार मराठी चित्रपट होणे अत्यंत आवश्यक आहे. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री सोबतच चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज कपूर, राजकुमार, अमिताभ बच्चन, दिलीपकुमार, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांचा अभिनय असलेले चित्रपट आजही रसिकांचे आकर्षण आहेत. आजही दर्जेदार सिनेमा असेल तर, रसिक कितीही पैसे खर्च कितीही दूर असलेल्या चित्रपटगृहात पाहण्यासाठी जातात. नुकताच धुरंधर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रचंड व्यवसाय केला. या चित्रपटाचे गारुड रसिकांच्या मनावर कायम आहे. अनेक जण त्यामध्ये अक्षय खन्नाच्या गाण्यावर रिल करीत आहेत. ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाल्याने तो एकाचवेळी देश आणि विदेशात कमी खर्चात पाहिला जातो. हा फायदा जरी तरी, रसिकांनी चित्रपटगृहात जाऊन तो पाहावा, अशी निर्मिती होणे आवश्यक आहे.