लक्ष द्या! मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर 'या' वाहनांना बंदी

    दिनांक :07-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Mumbai Pune Expressway मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प १ मे २०२६ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या नव्या मार्गिकेमुळे महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होणार असून घाट परिसरातील वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे.
 

Mumbai Pune Expressway 
गेल्या काही वर्षांत मुंबई–पुणे Mumbai Pune Expressway एक्स्प्रेसवेवर वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या वाढला आहे. विशेषतः घाट परिसरात अरुंद व वळणदार रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची आवश्यकता अधिक तीव्र झाली होती. या मार्गिकेमुळे विद्यमान घाट मार्गावरील खडबडीत आणि धोकादायक टप्पे टाळता येणार असून वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.सुमारे १९.८० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात अत्याधुनिक बोगदे, केबल-स्टेड पूल तसेच उंचीवरून जाणाऱ्या मार्गिकांचा समावेश आहे. या पायाभूत सुविधांमुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी सरासरी ३० मिनिटांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व इंधनाची बचत होणार असून वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
म्हणून वाहनांना बंदी  
 
 
दरम्यान, सुरक्षिततेच्या Mumbai Pune Expressway दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत या ‘मिसिंग लिंक’ मार्गावर स्फोटके तसेच ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून अशा प्रकारची वाहने घाट परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.मिसिंग लिंक प्रकल्पाची बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे एप्रिलच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि गुणवत्ता तपासणी पूर्ण करून १ मे रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर अपघातांचे प्रमाणही घटेल आणि घाट भागातील प्रवास अधिक सुरक्षित बनेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असून दररोज सुमारे ७५ हजारांहून अधिक वाहने या मार्गावरून धावतात. अशा परिस्थितीत ‘मिसिंग लिंक’चा विकास आणि त्याचे सेवेत आगमन प्रवासी, व्यापारी वाहतूक तसेच संपूर्ण वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.