नागपूर,
solar-energy-scheme : प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत देशभरात घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणीला वेग आला असून महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात आघाडीवर आहे. सोलर रूफटॉपच्या माध्यमातून खाजगी तसेच गृहवापरासाठी स्वच्छ व ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. या योजनेत नागपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून, विदर्भातील अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांचा पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समावेश असल्याची माहिती नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे संचालक आदित्य प्रताप सिंग यांनी दिली.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट तर्फे आयोजित एडवांटेज- खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत प्रधानमंत्री घर मोफत वीज योजनेवर विशेष माहितीपूर्ण व सविस्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे संचालक आदित्य प्रताप सिंग यांनी घरांसोबतच सरकारी इमारतींवर सौरऊर्जाकरणास प्राथमिकतेने प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
दररोज ६,५०० रूफटॉप सौर प्रकल्पांची स्थापना
या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित वेग नव्हता, मात्र आता पूर्णतः बदलली आहे. संपूर्ण देशात दररोज ६,५०० पेक्षा अधिक रूफटॉप सौर प्रकल्पांची स्थापना होत आहे, हे योजनेच्या यशाचे स्पष्ट उदाहरण असल्याचे आदित्य प्रताप सिंग यांनी नमूद केले.
सूर्य घर मोफत वीज योजना यशस्वी होण्यामागे नोंदणीकृत विक्रेते व सेवा पुरवठादारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल व ऑटोमेटेड आली असून, अनुदानाचे वितरणही अत्यंत वेगाने व पारदर्शक पद्धतीने होत आहे, असे महावितरणचे अधिकारी तालेवार यांनी स्पष्ट केले.
५.७५ टक्के व्याजदराने कर्ज सुविधा
या प्रसंगी एमएसईडीसीएलचे कार्यकारी संचालक रेशमे व तगडपलीवार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सूर्य घर योजनेअंतर्गत नोंदणीकृत विक्रेते तसेच नव्याने नोंदणी करू इच्छिणारे विक्रेते मोठ्या संख्येने होते.
सध्या ५.७५ टक्के व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करून जात आहे. याच सत्रात जनसमर्थ पोर्टल तसेच नवीन उपक्रमांवर विशेष चर्चा करण्यात आली.