नागपूर,
rahul-kelapure : गुंतवणूकदारांच्या प्रत्येक आर्थिक गरजा आणि जोखीम क्षमतेनुसार भांडवली (सिक्युरिटी) बाजारात विविध प्रकारची गुंतवणूक उत्पादने उपलब्ध असल्याचे प्रतिपादन सेबीचे सहाय्यक महाव्यवस्थापक राहुल केळापुरे यांनी केले. अॅडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत चर्चासत्रात ते भांडवली बाजारातील संधी आणि जोखीम या विषयावर बोलत होते.
ते म्हणाले, भांडवली बाजारात गुंतवणूकदारांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोने, चांदी, निफ्टी निर्देशांक फंड, क्षेत्रनिहाय म्युच्युअल फंड, मिड-कॅप किंवा स्मॉल-कॅप फंड अशा विविध प्रकारच्या गुंतवणूक संधी सेबीच्या नियमनाखाली आहेत. सुरक्षित गुंतवणूक करणार्यांपासून ते अधिक जोखीम घेणार्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांसाठी भांडवली बाजार विकसित झाला आहे.
आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या थेट मालमत्ता खरेदी न करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. सत्र अधिक संवादात्मक करताना त्यांनी गुंतवणुकीच्या विविध पद्धती, तसेच किती कालावधीसाठी ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले. अल्पकालीन व दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी योग्य आर्थिक साधनांची निवड आवश्यक असल्यावर त्यांनी भर आर्थिक सुरक्षिततेबाबत जनजागृती सेबीचे कार्यकारी संचालक जीवन सोनपरोते यांनी उपस्थितांना आर्थिक साक्षरतेच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले. लहान वयापासूनच गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी सेबी व शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात गिरीश देवधर, सेबीचे पियुष चौरसिया, बाला कुमारी, तसेच विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सहभागी झाले होते.