मुंबई मनपा महापौरपदी रितू तावडे उपमहापौरपदी संजय घाडी

    दिनांक :07-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Mumbai Mayor मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची निवड होईल, हे ठरवण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई मनपा महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या घोषणेची माहिती दिली.
 

Ritu Tawde, Sanjay Ghadi, Mumbai Mayor 
तर उपमहापौरपदी Mumbai Mayor  शिवसेनेकडून नगरसेवक संजय घाडी यांची निवड झाली आहे. शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनी उपमहापौरपदी संजय घाडी यांचे नाव जाहीर केले. उपमहापौर पदाचा कालावधी सव्वा वर्षे असेल.१३२ प्रभाग क्रमांकाच्या नगरसेविका रितू तावडे दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद आणि स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षपद भूषवले आहे. ईशान्य मुंबईच्या आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितू तावडे यांनी वीज दरवाढीविरोधात आक्रमक आंदोलन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये ती सक्रिय राहिल्या आहेत.भाजप आणि शिवसेनेच्या याप्रकारच्या वाटाघाटीनंतर झालेल्या या निर्णयामुळे मनपा प्रशासनातील नेतृत्व निश्चित झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित होईल अशी अपेक्षा आहे.