एसटीआर ०६ या वाघिणीला केले निसर्गमुक्त

07 Feb 2026 21:40:21
नागपूर,
tigress-released : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात शनिवार, सात फेब्रुवारीला ‘एसटीआर ०६’ या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले. गुरुवार, पाच फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास या वाघिणीला पेंच व्याघ्रप्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून करण्यात आले. त्यानंतर थेट या वाघिणीची रवानगी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या दिशेने करण्यात आली. नंतर बोटीने प्रवास हरुन या वाघिणीला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात शुक्रवारी रात्री आणले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. तिला पाणी मटण खाण्यासाठी देण्यात आले. ते तीने योग्य पद्धतीने खाल्ले. शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास कोयना गाभा जंगल क्षेत्रात तिला सुरक्षीत ठिकाणी सोडण्यात आले.
 
 

ngp 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0