अजित पवार यांचा 28 जानेवारीचा दाैरा कोणी ठरवला?

07 Feb 2026 12:13:26
मुंबई/बारामती
Ajit Pawar plane crash, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण राजकीय वातावरण हादरले आहे. २७ जानेवारीच्या रात्री घडलेल्या विमान अपघाताने राजकीय तसेच जनतेला मोठा धक्का दिला. अजित पवार बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चार सभांमध्ये सहभागी होण्यासाठी विमानाने ८.१० वाजता मुंबईहून निघाले होते. परंतु बारामती विमानतळाच्या अगदी जवळ हा भीषण अपघात घडला.
 

Ajit Pawar plane crash,  
सदर विमान अपघाताचे Ajit Pawar plane crash, काही व्हिडीओही समोर आले आहेत. काही सेकंदांतच विमान जमिनीवर कोसळले आणि मोठा स्फोट झाला. विमान कोसळल्यानंतर फक्त एकच नव्हे तर चार-पाच मोठे स्फोट झाले, ज्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेकांनी अपघाताबाबत संशय व्यक्त केला असून, सध्या ही घटना सीआयडीच्या चौकशीत आहे.अजित पवार यांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासांत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारताना पवार कुटुंबियांसोबत कोणतीही पूर्व चर्चा झालेली नव्हती, असा वृत्त आहे.सीआयडीच्या तपासात आता अपघाताच्या अनेक पैलूंवर सखोल चौकशी केली जात आहे. खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात चार तास चौकशी करण्यात आली. तपास अधिकारी २७ जानेवारीच्या रात्रीच्या प्रवासाचा नेमका आराखडा, कोणत्या व्यक्तींबरोबर चर्चा झाली, २८ जानेवारीच्या दौऱ्याचे नियोजन कोणाच्या सांगण्यावरून ठरवले गेले, विमानाची निवड कोणी केली आणि प्रवासामध्ये काही बदल झाले का, या सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात आहे.
साथच, अपघातात सहभागी विमानाचा ब्लॅक बॉक्स यंत्रणांनी जप्त केला असून त्याची सखोल तपासणी केली जात आहे. तपासातून अनेक महत्वाचे तथ्य समोर येऊ शकतात, ज्यामुळे अपघाताचे खरे कारण समजू शकेल.राज्यातील राजकीय नेते आणि नागरिक अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे अजूनही स्तब्ध आहेत, तर सीआयडीच्या चौकशीत गती आलेली आहे. या तपासाच्या निकालावर पुढील राजकीय वातावरण आणि अपघाताशी संबंधित जबाबदार्यांचा शोध लागण्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0