अ‍ॅडल्ट व्हिडिओ पाहताना समोर आली स्वतःचीच गर्लफ्रेंडसोबतची क्लिप आणि..

08 Feb 2026 13:26:52
हॉन्गकॉन्ग,  
China, Shenzhen, हॉटेलमध्ये मुक्काम करताना सुरक्षिततेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, मात्र चीनमधील शेनझेन येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. एरिक नावाचा एक तरुण इंटरनेटवर एका एडल्ट वेबसाईटवर व्हिडिओ पाहत असताना अचानक त्याला स्वतःचाच व्हिडिओ दिसला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
 
hong-kong-viral-news
 
हॉन्गकॉन्गचा रहिवासी असलेला एरिक २०२३ मध्ये आपल्या गर्लफ्रेंड एमिलीसोबत शेनझेनमधील एका हॉटेलमध्ये थांबला होता. काही आठवड्यांनंतर घरी परतल्यानंतर, नेहमीप्रमाणे तो इंटरनेटवर व्हिडिओ शोधत असताना एका क्लिपमध्ये त्याला परिचित दृश्ये दिसू लागली. तोच हॉटेलचा रूम नंबर, तेच फर्निचर आणि स्वतःचे सामान पाहून त्याला धक्का बसला. चौकशी केली असता, त्या खोलीत लपवून ठेवलेल्या ‘स्पाय कॅमेऱ्या’द्वारे त्यांच्या खासगी क्षणांचे जवळपास तासभर रेकॉर्डिंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, याआधी अशा प्रकारचे व्हिडिओ वास्तववादी वाटतात म्हणून एरिक ते पाहायचा, मात्र स्वतःच या सायबर गुन्ह्याचा बळी ठरल्यानंतर या प्रकारामागील भयावह आणि घृणास्पद वास्तव त्याला समजले. या घटनेचा एरिक आणि एमिली यांच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला.  China, Shenzhen, व्हिडिओ इंटरनेटवर आल्याचे कळताच दोघेही मानसिक धक्क्यात गेले आणि अनेक आठवडे त्यांनी एकमेकांशी संवादही साधला नाही. एमिलीला सतत ही भीती सतावत आहे की तिच्या कुटुंबातील किंवा ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने तो व्हिडिओ पाहिला तर काय होईल. या भीतीमुळे दोघांचेही सामाजिक आयुष्य बदलून गेले आहे.
आता बाहेर पडताना ओळख लपवण्यासाठी ते टोपी किंवा मास्क वापरतात आणि हॉटेलमध्ये थांबणे त्यांनी जवळपास टाळले आहे. एरिक अजूनही त्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट देतो, मात्र व्हिडिओ पाहण्यासाठी नाही, तर आपला व्हिडिओ पुन्हा अपलोड झाला आहे का, हे तपासण्यासाठी.  China, Shenzhen,चीनमध्ये छुप्या कॅमेऱ्यांद्वारे व्हिडिओ शूट करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्याने गुन्हा असला तरी हा काळाबाजार गुपचूप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे समोर आले आहे. अधिकृत तपासणीत देशातील विविध हॉटेल्समध्ये १८० हून अधिक लपवलेले कॅमेरे आढळून आले आहेत. यानंतर सरकारने हॉटेल मालकांसाठी कठोर नियम लागू केले असून, प्रत्येक पाहुण्यानंतर खोलीची सखोल तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. तरीही, दररोज हजारो नवीन व्हिडिओ बेकायदेशीररीत्या इंटरनेटवर विकले जात असल्याने नागरिकांच्या खासगी आयुष्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0