सायबर गुन्हेगाराच्या घशातून काढले 6 लाख परत

08 Feb 2026 21:28:11
- गुंतवणुकीच्या नावाखाली 13 लाखांची सायबर फफसवणूक
- इंदूरमधून दाेन सायबर गुन्हेगारांना अटक : सहा लाख रुपये मिळवले परत

अनिल कांबळे
नागपूर,
Cyber crime कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या  एका सायबर टाेळीचा नागपूर पाेलिसांनी उरडगाड केला. ग्राेथ इंडिया रिसर्च इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावाने फफसवणूक करणाèया दाेन आराेपींना मध्यप्रदेशातील इंदूर शहरातून अटक करण्यात आली असून, पाेलिसांनी तक्रारदाराचे जवळपास 6 लाख रुपये परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे.
 
 
Cyber crime
 
माहितीनुसार, 18 नाेव्हेंबर 2025 राेजी नागपूर सायबर पाेलिस ठाण्यात एका तक्रारदाराने फफसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. आराेपींनी ग्राेथ इंडिया रिसर्च इन्व्हेस्टमेंट कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांना गुंतवणुकीवर माेठ्या नफफफफ्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी आराेपींनी बनावट ईमेल देखील पाठवले हाेते. या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी आराेपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर एकूण 13 लाख 27 हजार 376 रुपये जमा केले. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फफसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुन्हा दाखल हाेताच सायबर पाेलिसांनी ज्या बँक खात्यांवर पैसे वळवण्यात आले हाेते, त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी 7 ेब्रुवारी राेजी इंदूर येथून ब्रिजेश नामदेवभाई सूर्यवंशी (37, बालदा काॅलनी, इंदूर) आणि दीपक सुभाषचंद्र अग्रवाल (48, आनंदनगर, इंदूर) या दाेन आराेपींना अटक केली.
 
 
अशी करायचे फफसवणूक
Cyber crime आराेपी दीपक अग्रवाल हा बँक खाते उघडायला लावून त्यांची सर्व कागदपत्रे स्वत:कडे घेत असे. या खात्यांचा वापर करून ताे िफफर्यादींची रक्कम वळवून घेत हाेता आणि आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने त्या पैशांची विल्हेवाट लावत हाेता. या टाेळीकडून आणखीही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे.
 
 
सहा लाख रुपये परत
सायबर पाेलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, फिर्यादीच्या बँक खात्यावर आतापर्यंत 5 लाख 96 हजार 712 रुपये परत मिळाले आहेत. उरलेली रक्कम आणि या साखळीतील इतर आराेपींचा शाेध पाेलिस घेत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या घशातून पैसे परत आणणे कठिण असतानाही पाेलिसांनी दाेन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे, हे विशेष.
Powered By Sangraha 9.0