नव्या पिढीला 'तीन खानची' काय गरज? आवडत संपली

08 Feb 2026 11:58:06
मुंबई
Imran Khan बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच स्पष्टवक्त्या शैलीसाठीही ओळखला जातो. नुकताच तो “हॅपी पटेल: डेंजरस डिटेक्टिव्ह” या चित्रपटात झळकला असून, याच दरम्यान त्याने बॉलिवूडमधील तीन दिग्गज कलाकार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.
 

Imran Khan statement on Khans, 
सलमान, शाहरुख आणि आमिर खान यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. ९०च्या दशकापासून सुरू झालेली त्यांची लोकप्रियता आजही कायम असून, हे तिघेही बॉलिवूडचे एव्हरग्रीन सुपरस्टार मानले जातात. मात्र Imran Khan  त्यांच्या कारकिर्दीबाबत इमरान खानने व्यक्त केलेले मत सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.शोशाला दिलेल्या एका अलिकडच्या मुलाखतीत इमरान खान म्हणाला, “वयानुसार भूमिका बदलत जातात. काही वर्षे तुम्ही मुख्य नायकाच्या भूमिका साकारता, पण एक टप्पा असा येतो की त्या वयात लीड रोल साकारण्याची क्षमता नैसर्गिकरित्या कमी होते. तीनही खान आता ६० वर्षांहून अधिक वयाचे आहेत आणि त्यांनी ३० वर्षांपेक्षा जास्त काळ स्टारडम अनुभवले आहे.”पुढे बोलताना त्याने या बदलाकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. “हे स्वीकारणं कठीण असतं, पण कोणत्याही अभिनेत्याच्या प्रवासातील हा आवश्यक भाग आहे. जसजसे वय वाढते, तसतसे भूमिका बदलतात आणि स्टारडमचं स्वरूपही बदलतं. कारण प्रेक्षकवर्गही बदलत जातो. एक प्रेक्षक तुमच्यासोबत मोठा होतो, तर त्यानंतर एक नवी पिढी येते,” असे इमरानने स्पष्ट केले.
 
 
 
तो पुढे म्हणाला, “आपण जेव्हा सिनेमे पाहतो तेव्हा त्या कथेतील नायकात स्वतःला पाहतो. त्यामुळे आजची युवा पिढी कदाचित ७० वर्षांच्या व्यक्तीला नायकाच्या भूमिकेत पाहण्यात फारसा रस घेणार नाही. हे नैसर्गिक आहे आणि याकडे बदल म्हणून पाहायला हवे.”
इमरान खानच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी त्याच्या प्रामाणिक मताचे समर्थन केले आहे, तर काही चाहत्यांनी तीनही खान अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सक्षम असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, इमरान खानने मांडलेला हा दृष्टिकोन बॉलिवूडमधील पिढीगत बदल आणि स्टारडमच्या बदलत्या स्वरूपावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणारा ठरला आहे.
Powered By Sangraha 9.0